बुलढाणा : ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी :

साहित्यसम्राट Kusumagraj यांच्या कविता आणि साहित्य हे मराठी सारस्वतातील सुवर्णाक्षरांनी लिहिलेले पान असून हा समृद्ध वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन कवी सुधाकर मानवतकर यांनी केले. स्थानिक विदर्भ महाविद्यालय (कला व वाणिज्य) येथे मराठी विभागाच्या वतीने आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद गायकी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सीमाताई सोनोने उपस्थित होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते Tukaram यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
संस्कृती जपण्याचे आवाहन
मराठी विभाग प्रमुख प्रा. मुनेश्वर जमईवार यांनी प्रास्ताविकात बदलत्या जीवनशैलीवर चिंता व्यक्त करताना सांगितले की, आपण आपली मूळ संस्कृती, लोकगीते आणि लोकपरंपरा विसरत चाललो आहोत. हे सांस्कृतिक अधःपतन भाषेच्या भविष्यासाठी धोकादायक ठरू शकते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. गोविंद गायकी यांनी मराठी भाषेचा गौरव सातासमुद्रापार नेणाऱ्या पूर्वसुरींच्या कार्याचा आढावा घेतला आणि हा साहित्यिक ठेवा जतन व वृद्धिंगत करण्याची जबाबदारी तरुण पिढीवर असल्याचे नमूद केले.
काव्य सादरीकरणाने रंगत
कार्यक्रमात आयोजित काव्य सादरीकरणात विद्यार्थिनी नम्रता खत्री आणि विद्यार्थी सागर कस्तुरे यांनी लोकगीते व लोककाव्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
प्रा. सीमाताई सोनोने यांनी Dnyaneshwar ते Tukdoji Maharaj यांच्या साहित्यातील माधुर्य आणि भाषेचे सौंदर्य उदाहरणांसह विशद केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

0 9 3 6 2 9
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *