खोजमास्टर-अविनाश लाड.
मेहकर:-मेहकर शहरातील नामांकित भारतीय ज्ञानपीठ विद्या मंदिराचे वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्या मंदिराचे मुख्याध्यापक परसुवाले सर म्हणाले की पत्रकार हा समाजाचा आरसा असून समाजातील चांगल्या वाईट गोष्टींना दिशा देण्याचे काम पत्रकार बांधव सातत्याने करीत असतात
पुढे बोलतांना परसुवाले सर म्हणाले की पत्रकारांबाबत सांगावयाचे झाल्यास
“निगाहों में मंजिल साफ थी,
बार-बार गिरे,
मगर गिरकर संभलते रहे.
हवाओंने कोशिशे तो बहुत की,
मगर हम वो चिराग थे,
जो आंधियो में जलते रहे
अशा परिस्थितीत पत्रकार बांधवाना कामं कराव लागते तसेच पत्रकार पत्रकारीते सोबतच सामाजिक,राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातही पत्रकार लेखणीच्या माध्यमातून
विविध उपक्रम सुद्धा राबवत असतात आणि समाजातील चांगल्या वाईट गोष्टी सातत्याने समाजापुढे मांडत असतात. पत्रकारांच्या सामाजिक कार्याचा आलेख खूप उंच असून माणसं जोडणारा असतो आणि ज्या समाजातून आपण आलोत त्या समाजाच आपणं काहीतरी देणे लागतो या सामाजिक जाणिवेतून पत्रकार सामाजिक कार्यात सहभाग घेतात.यावेळी या कार्यक्रमाला सत्कारमूर्ती म्हणून शहरातील रफिक कुरेशी,भरत सारडा, जयचंद बाठीया, जुगराज पठ्ठे, ज्ञानदेव मानवतकर, संतोष जाधव, फिरोज शाहा, प्रविण गायकवाड, मुन्ना काळे, संतोष मलोसे, संतोष सारडा, ज्ञानेश्वर इंगळे, दत्ता उमाळे, अय्युब पठाण,अलिम शेख, विश्वंभर दळवी आदींची उपस्थिती होती यावेळी मुख्याध्यापक परसुवाले सरांनी पत्रकार दिनानिमित्त भारतीय ज्ञानपीठ विद्या मंदिराचे अध्यक्ष रामकिसन काबरा,सचिव विशाल काबरा,संचालक तथा माजी नगरसेवक ललित इण्णानी व शिक्षक परिवाराच्या वतीने आभाळभर पत्रकार बांधवाना शुभेच्छां दिल्या यावेळी भारतीय ज्ञानपीठ चे शिक्षक इरफान शेख,माधव अवचार,राहूल मोरे, योगेश दाभाडे,दिलीप नवघरे मुकेश लाड शिक्षिका प्रेरणा जोशी,आशा खेरोडकर,जयश्री शिंगणे,श्वेता गवई, ज्योत्स्ना गवई,अर्चना गवई,अर्चना नखाते, सुजाता भालेराव, आश्लेषा साखरकर, नलिनी क्षीरसागर, देविका घनवट,मनिषा धुळे,प्रज्ञा अवसरमोल,स्वाती वायाळ,जयश्री कळसकर,मंदा सारसकर,मीना अवचार,अलका निंबेकर आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय ज्ञानपीठ चे पर्यवेक्षक के एम गारोळे यांनी तर आभार प्रदर्शन अमोल मानवतकर
यांनी केले.