दडपशाहीला झुगारून उत्स्फूर्त मतदान करा- संदीपदादा शेळके

Khozmaster
1 Min Read
बुलडाणा : दडपशाही, गुंडागर्दीला झुगारुन नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन उबाठा पक्षाचे जिल्हा समन्वयक संदीपदादा शेळके यांनी केले.
      संदीपदादा शेळके यांनी आज सहकुटुंब मतदान केल्यानंतर सोशल मिडियावरून मतदारांना आवाहन केले. लोकशाहीत घटनेने प्रत्येकाला मताचा अधिकार दिलेला आहे. गरीब असो की श्रीमंत सर्वांना एकसमान अधिकार आहे. त्यामुळे आपले मत निर्णायक आहे. प्रत्येक नागरिकाने आपला हक्क बजावून लोकशाही बळकट केली पाहिजे. कुठल्याही आमिषाला बळी न पडता किंवा कोणाच्याही धमकीला न घाबरता मतदान करा, असे आवाहन संदीपदादा शेळके यांनी केले.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *