मानधनवाढ व समिती स्थापनेसाठी विदर्भ लोककलावंत संघटनेची निर्णांयक लढाई !

Khozmaster
3 Min Read

“जिल्हाधिकारी कार्यालयावर क्रांतीकारी धरणे आंदोलनाचा इशारा.”

कारंजा (लाड) – वृध्द कलावंतांना मिळणार्‍या तुटपुंज्या मानधनात भरीव वाढ, गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित असलेल्या कलावंतांच्या प्रस्तावावर निर्णय व वृध्द कलावंत मानधन समितीची स्थापना आणि इतर अनेक मागण्यांसाठी विदर्भ लोककलावंत संघटनेने संवैधानिक मार्गाने निर्णायक लढाईचा निर्णय घेतला असून कलावंतांच्या मागण्या त्वरीत पुर्ण करा अन्यथा येत्या २४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. यासंदर्भात नुकतेच विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांच्या नेतृत्वात तहसिलदार कारंजा यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, सांस्कृतिक विभागाकडून वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन योजनेमार्फत दिले जाणारे मानधन हे वाढत्या महागाईच्या काळात अत्यंत तुटपुंजे आहे. या मानधनात वृध्द कलावंतांना आपले भरणपोषण आणि आजार उपचार आदींवर औषधोपचार होवू शकत नाही. तसेच गेल्या पाच वर्षापासून जिल्हयात वृध्द कलावंत मानधन समितीची स्थापना झाली नसल्यामुळे मानधनाच्या प्रतिक्षेत शेकडो प्रस्ताव लालफितशाहीत अडकून पडले आहेत. त्यामुळे वृद्ध कलावंतांना सरसकट किमान पाच हजार रुपये मानधन, शासकिय निमशासकिय समित्याची पुनर्रचना, वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन लाभार्थी निवड समितीची स्थापन, समितीवर केवळ कलावंतांचीची निवड, प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी, मृतक कलावंताच्या वारसदारांना वारसाहक्काने मानधन आदी मागण्या सरकारने तात्काळ पुर्ण कराव्या. अन्यथा येत्या २४ जानेवारी विदर्भ लोककलावंत संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. निवेदनावर विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे, महाराष्ट्र शासन दलितमित्र पुरस्कार प्राप्त रामबकस डेंडूळे, महाराष्ट्र शासन समाजभूषण पुरस्कार प्राप्त आणि कर्मयोगी संत गाडगेबाबाची भूमिका साकारणारे – शिवमंगलआप्पा राऊत ; महाराष्ट्र शासन समाजभूषण पुरस्कार प्राप्त आणि महाराष्ट्र शासन पुरस्कृत “जय हो स्वच्छ भारत अभियान” चित्रपटात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची भूमिका साकारणारे नटसम्राट कलावंत – प्रकाश गवळीकर ; माजी सरपंच प्रदिप वानखडे,परिवर्तन कला महासंघ वाशिमचे जिल्हाध्यक्ष शेषराव मेश्राम, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष पूर्णाजी खंदारे, कलावंत राजाराम राऊत, लक्ष्मणराव इंगळे, लक्ष्मण फुके, गजानन वाडेकर, भिकाराम जगताप, अंबादास राऊत, रमेश गावंडे, पंजाबराव सुर्वे, मुकूंदा दाते, सौ. रेखाताई टोपले, लोमेश पाटील चौधरी,उमेश अनसाने,अश्विन जगताप, नंदकिशोर कव्हळकर, माणिकराव हांडे, उमेश अनासाने, विजय खंडार,रोहीत महाजन,कैलास हांडे, श्याम घारु,गोंधळी कलाकार सुरेश हांडे, सौ सिमाताई सातपुते, सौ शारदाताई भुयार, सौ छायाताई गावंडे, सौ कृपाताई ठाकरे, श्रीमती कांताबाई लोखंडे, सौ. इंदिराबाई मात्रे, आदींची उपस्थिती होती. तसेच कलावंतांच्या न्याय हक्कासाठी जिल्हयातील कलावंतांनी गट-तट आणि राजकिय पक्ष विसरुन या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन ज्येष्ठ दिव्यांग समाजसेवक तथा लोककलावंत संजय कडोळे यांनी केले आहे.

0 9 4 6 7 8
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *