खोजमास्टर प्रतिनिधी – बार्शीटाकळी आज बुधवारी अल फ़लाह उर्दू प्राथमिक शाळा बार्शीटाकळी येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी चे आयोजन करण्यात आले होते यावेळी शासनाचे निर्देशाप्रमाणे विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली यावेळी संस्थापक उपाध्यक्ष शाहिद इकबाल खान सरफराज खान यांची उपस्थिती होती यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र बार्शीटाकळी यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शाळेत करण्यात आले होते यावेळी बार्शीटाकळी ग्रामीण रुग्णालय मधील डॉ सपना बाठे डॉ मनीष मेन सिस्टर दर्शना घावट यांनी वर्ग एक ते चार मधील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली व सर्व शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणारे मोफत उपचार बाबत मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांना स्वच्छताचे मूलमंत्र देऊन हात धुण्याची विविध पद्धती बाबत माहिती दिली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद फारूक गुलाम दस्तगीर यांनी विद्यार्थ्यांना तंबाखू मुक्ती मोबाईलचे दुष्परिणाम इत्यादी बाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले तसेच तंबाखूचे दुष्परिणाम बाबत सविस्तर माहिती दिली यावेळी कार्यक्रमाची प्रस्ताविक सहाय्यक अध्यापक शब्बीर अहमद शेख मन्नान यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक शिक्षक सखा उल्लाह खान समीउल्ला खान अब्दुल रशीद अब्दुल बशीर आदींनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वकार खान यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.