चिखली-मेहकर मार्गावर एसटी बस आणि एका खाजगी बसचा भीषण अपघात.एका महिलेचा यात जागीच मृत्यू !२५ प्रवासी या अपघातात जखमी झाले आहे.

Khozmaster
2 Min Read

मन्सूर शहा दैनिक खोज मास्टर न्यूज धोत्रा भनगोजी (चिखली बुलढाणा):–बुलढाणा जिल्ह्यातील चिखली-मेहकर मार्गावर एसटी बस आणि एका खाजगी बसचा भीषण अपघात ( झालाय. या बस मध्ये एकूण ४४ प्रवासी होते. तर त्यातील २५ प्रवासी या अपघातात जखमी झाले असून एका महिलेचा यात जागीच मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच यात सहा प्रवाश्यांची प्रकृती गंभीर असून सध्या जखमींना मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ओवरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरील वाहनांचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असून खाजगी बसने एसटी बसला मागून धडक दिली. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत.
एका महिलेचा जागीच मृत्यू, २५ जखमी
प्राथमिक माहितीनुसार, बुलढाण्याच्या अहमदपूर येथून ही बस ४४ प्रवासी घेऊन निघाली होती. दरम्यान, बस चिखली ते मेहकर रोडवरील नांद्री फाट्या नजीक अली असता मागून येणाऱ्या शिरोही ट्रॅव्हल्स या भरधाव खाजगी बस ने अचानक एसटी बसला धडक दिली. या ट्रॅव्हल्सचा वेग अधिक असल्याने या अपघातात एसटी बसचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर शिरोही ट्रॅव्हल्स नामक ही खाजगी बस सुरतवरून मेहकरला जात होती. या बसमध्ये स्लीपर कोच असल्याने त्यातील झोपलेले आठ प्रवाशीही किरकोळ जखमी झाले आहेत.
तर एसटीमध्ये बसलेल्या एका महिला प्रवासीचा यात जागीच मृत्यू झाला असून बस मधील इतर २५ प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे. मात्र, यात सहा प्रवाशांची प्रकृती चितांजनक असल्याचेही बोलले जात आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *