पिंपळनेर ता.बीड बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा- महायुतीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय सौ.पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला उपस्थित राहून शिवसेना नेते खासदार मा.प्रतापराव जाधव साहेब यांनी मार्गदर्शन केले.
राष्ट्रमाता जिजाऊंचे माहेर असलेल्या बुलढाणा जिल्ह्याचे खासदार आणि शिवसेना महायुतीचे लोकसभेचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी बीडमध्ये आले. आदरणीय पंकजाताईंच्या एका सभेमुळे माझ्यासारखे अनेक नेते निवडून येतात अशा शब्दांत त्यांनी पंकजाताईंचा नेतृत्व बीडसाठी किती महत्वाचे आहे हे अधोरेखित केले.
भाजप-महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या प्रचारार्थ संपूर्ण जिल्हा पिंजून काढला आहे.ठीकठिकाणी होणाऱ्या बैठका, पदयात्रा जाहीर सभा या सर्वच ठिकाणी मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पंकजाताई मुंडे या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या विचारांचा वारसा घेऊन समाजकारण आणि राजकारण समर्थपणे करत आहेत. सर्व,धर्म,समभाव ही शिकवण घेऊन पंकजाताई सर्व जाती धर्माच्या लोकांना सन्मान देऊन विकासाचे राजकारण करतात.
गेले कित्येक वर्ष आम्ही दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब आणि त्यांच्यानंतर पंकजाताईंच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. बीड लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पंकजाताई मुंडे सामोरे जात आहेत. पंकजाताईंच्या एका सभेमुळे माझ्यासारखे अनेक जण निवडून येतात हा इतिहास आहे. त्यांचे विचार, काम करण्याची पद्धत आणि उस्फुर्त भाषण मतदारांना भावते.
जेष्ठ नेते श्री.रमेश आडसकर,भाजप चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह महायुतीतील सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.