बीड : ‘मुस्लिमांच्या मतांसाठी व तुष्टीकरणासाठी काँग्रेस आणखी एक धोकादायक खेळ खेळत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित, दलित, आदिवासींना दिलेले आरक्षण संपविण्याचा कॉँग्रेसचा प्रयत्न आहे,’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अंबाजोगाई येथे केला.
भाजप-महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ मोदी यांची अंबाजोगाईतील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सभा झाली. भाषणाच्या सुरुवातीलाच मराठीतून संवाद साधत मोदींनी परळी वैद्यनाथ, योगेश्वरी देवी, संत भगवान बाबा, संत नारायण महाराजांना नमन करीत असल्याचे सांगितले.