बीड: बीड लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत उभे असलेले ७ उमेदवारांना निवडणूक खर्चाची नोंदवही तपासणीसाठी सादर करण्यात कसूर केल्याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी नोटीस बजावली आहे. नोंदवही लेखांची प्रथम तपासणी न करणार्या उमेदवारांमध्ये करुणा धनंजय मुंडे, शेषेराव चोकोबा वीर, गोकुळ बापूराव सवासे, प्रकाश भगवान सोळंके, राजेंद्र अच्युतराव होके, शेख तौसिफ अब्दुल सत्तार, शेख एजाज शेख उमर यांची नावे आहेत.भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे, यांना आणि नॅशनॅलिस्ट कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे या दोन उमेदवारांना तपासणीसाठी सादर केलेल्या निवडणूक खर्चातील तफावती बाबत नोटीस जारी करण्यात आलेले आहे.