मेहकर:-07/05/2024
तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त भव्य बुद्ध-भीम महोत्सव 2024 निमित्त मेहकर येथे विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा भव्य पुरस्कार सत्कार सोहळा व तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गाजलेल्या आंबेडकर चळवळीतील प्रसिद्ध गायिका मा.कडूबाई खरात मुंबई यांचा बुद्ध-भीम गीताचा प्रबोधनात्मक बहारदार गीतांचा कार्यक्रम दिनांक 7 मे 2024 रोजी मेहकर येथील स्वतंत्र मैदानात हजारोच्या संख्येने उसळलेल्या जनसागराच्या साक्षीने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून महाराष्ट्र शासनाचे गृह विभागाचे सचिव सिद्धार्थजी खरात साहेब तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती मेहकर चे अध्यक्ष प्रा.डी.जी. गायकवाड तर स्वागत अध्यक्ष म्हणून मेहेकर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे पक्ष नेते ॲड.अनंतराव वानखेडे उपस्थित होते.
तर सत्कार मूर्ती म्हणून मेहकर शहर गौरव पुरस्कार प्राप्त तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.श्याम उमाळकर मेहकर भूषण पुरस्कार प्राप्त श्री. रवी अग्रवाल, भिमरत्न पुरस्कार प्राप्त डॉ.विजय चराटे,डॉ.अमित ताजने,उद्योजक पुरस्कार प्राप्त किशोर गारोळे,कैलास चनखोरे साहित्य रत्न पुरस्कार प्राप्त डॉ.हर्षनंदन खोब्रागडे, रमाई पुरस्कार प्राप्त डॉ.मंजुश्री खोब्रागडे, ऍड माधुरी देवानंद पवार तसेच मूकनायक पुरस्कार प्राप्त नागेश कांगणे व दत्ता उमाळे उपस्थित होते.
यावेळी श्याम उमरकर यांना आयोजक समितीच्या वतीने मेहकर गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला राजकारणामध्ये कोणत्याही प्रकारचा वसा व वारसा नसताना श्याम उमाळकर यांनी जिल्ह्यामध्ये व राज्यातील राजकारणात स्वतःचे नाव अधोरेखित करून,सर्वसामान्य जनतेच्या अनेक अडीअडचणी मध्ये सहकार्य केले तसेच आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली तसेच त्यांनी आपल्या जीवनामध्ये सामाजिक-आर्थिक-शैक्षणिक- धार्मिक क्षेत्रांमध्ये आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले.त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती मेहकर द्वारा त्यांना शाल,बुके व सन्मानचिन्ह देऊन मेहकर शहर गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच यावेळी मेहकर शहरातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय क