वाशिम जिल्हा प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर
वाशिम ; दिनांक २२ मे २०२४ रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय वाशिम अंतर्गत मा.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल कावरखे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालय,वाशिम येथे तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थामुळे मानवी शरिरावर होणारे दुष्परिणाम या बाबत जाणीव जागृती करिता पोस्टर स्पर्धा व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. तसेच तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थामुळे होणारे विविध आजार , तंबाखू जन्य पदार्थ नियंत्रण कायदा (कोटपा २००३ ) या बाबत मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्ती पत्र व ट्रॉफी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली .
सदरील कार्यक्रमा करिता जिल्हा रुग्णालय वाशिम येथील जिल्हा सल्लागार डॉ.आदित्य पांढारकर , मानस शास्त्रज्ञ श्री.राम सरकटे, सामाजिक कार्यकर्ते श्री.रामकृष्ण धाडवे, शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालय चे, ट्यूटर कु.दिपाली दंदी मॅडम , कु.स्नेहल महल्ले मॅडम, श्री.मनोज गावंडे सर ,श्री.चेतन जोशी सर कु.ढोरे मॅडम उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालय , वाशिम येथील प्राचार्य. कु.माधुरी पेठकर मॅडम व सर्व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.