सहा लाखाची लाच घेतांना जिल्हा उपनिबंधक जाळ्यात

Khozmaster
1 Min Read

वाशिम : प्राथमिक चौकशीचा (कसुरी अहवाल) अहवाल तक्रारदार यांची बाजूने अनुकूल पाठवण्यासाठी जिल्हा उपनिबंधक वर्ग १, सहकारी संस्था वाशिमचे दिग्विजय राठोड यांनी ९ लाख रुपये लाचेची मागणी केली होती.

त्यातील उर्वरित ६ लाख रुपयाची लाच स्वीकारताना अकोला एसीबी पथकाने ६ जून रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास तिरुपती सिटी वाशिम येथे रंगेहाथ पकडले.

मंगरूळपिर येथील तक्रारदार यांचे विरूध्द सुरू असलेल्या प्राथमिक चौकशीचा अहवाल तक्रारदार यांची बाजूने अनुकूल पाठवण्यासाठी राठोड यांनी ९ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. दरम्यान तक्रारदार याने त्यामधील २ लाख ५० हजार रुपये अगोदरच दिले होते. उर्वरित राहिलेले पैसेसाठी तकादा लावल्या जात असल्याची तक्रार तक्रारदार यांनी ४ रोजी अकोला येथील अँटी करप्शन ब्युरो येथे दिली.

नमूद तक्रारीच्या अनुषंगाने ६ जून रोजी पडताळणी कारवाई केली . यावेळी आरोपी राठोड यांनी तडजोडीअंती तक्रारदारास ६ लाख रुपये लाच रक्कम मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून ६ जून रोजी रात्री तिरुपती सिटी येथील सिल्व्हर अपार्टमेंट मध्ये त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी सापळा रचला व राठोड यांना रंगेहाथ पकडले . त्यांना ताब्यात घेण्यात आले .

सदरची कारवाई अकोला एसीबी पथकातील पोलिस निरीक्षक सचिन सावंत, यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार, पोलिस अंमलदार दिगंबर जाधव, अभय बावस्कर, संदीप ताले, निलेश शेगोकार यांनी यशस्वीरीत्या केली .

0 8 9 4 6 1
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *