कॉफी डेटवर जयासोबत फरीदा जलाल यांना देखील न्यायचे बिग बी; अभिनेत्रीने म्हणाली, ‘कबाब में हड्डी..’

Khozmaster
2 Min Read

रीदा जलाल (farida jalal) हे नाव बॉलिवूडसाठी नवीन नाही. फरीदा यांनी त्यांच्या आयुष्यातली बरीच वर्ष इंडस्ट्रीत घालवली आहेत. अगदी कुछ कुछ होता हैं पासून ते हिरामंडीपर्यंत अनेक गाजलेल्या प्रोजेक्टमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

अलिकडेच त्यांनी बॉलिवूड बबलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी इंडस्ट्रीतील अनेक किस्से, प्रसंग सांगितले. यामध्येच त्यांनी अमिताभ बच्चन (amitabh bachchan) आणि जया बच्चन (jaya bachchan) यांचा एक किस्सा सांगितला.

फरीदा यांनी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यासोबत अनेक सिनेमांमध्ये स्क्रीन शेअर केली आहे. त्यामुळे त्यांच्यात छान मैत्रीचं नात आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी बिग बी, जया यांना डेट करत होते त्यावेळी अनेकदा फरीदा सुद्धा त्यांच्यासोबत कॉफी डेटवर जायच्या. या मुलाखतीमध्ये त्यांनी जया-अमिताभ बच्चन यांच्यासोबत ताज हॉटेलमध्ये कॉफी डेट, लाँग ड्राइव्हला जात असल्याचं सांगितलं.

“मी पाली हिलला रहायचे आणि अमिताभजी जुहू मध्ये. त्यावेळी त्याचं लग्न होणार होतं. दोघांचं त्यावेळी कोर्टशीप सुरु होतं आणि अन्य कपल्सप्रमाणे त्यांच्यातही भांडण वगैरे व्हायचे. अमितजी रात्रीच्या वेळी गाडी चालवायचे आणि जया त्यांच्या बाजुला बसलेली असायची. आणि मी मागच्या सीटवर. त्यामुळे मी त्यांना कायम म्हणायचे की, तुम्ही मला कबाबमध्ये हड्डी व्हायला का घेऊन येता?. मी त्यांना रिक्वेस्ट केली होती की, तुमच्या कॉफी डेटवर मला नकासोबत घेऊन जाऊ. कारण, घरी यायला रात्री खूप उशीर व्हायचा”, असं फरीदा म्हणाल्या.

पुढे त्या म्हणतात, “रात्री लवकर झोपणाऱ्यांपैकी मी होते पण ते मला कायम त्यांच्यासोबत घेऊन जायचे. ते भांडण करायचे आणि मी पहात बसायचे. जया रडायची आणि अमिताभ तिची समजूत काढायचा. मला तो काळ खरंच खूप आवडायचा. जया सोबत माझी खूप जुनी मैत्री आहे. मी तिला प्रेमाने जिया म्हणायचे. कॉफी डेटवरुन घरी येतांना ती सिनेमाबद्दल माझ्याशी बोलायची. आधी मला घरी सोडायची मग ती तिच्या घरी जायची.”

दरम्यान, फरीदा यांनी १९६० मध्ये त्यांच्या करिअरची सुरुवात केली. तेव्हापासून त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. ‘कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता है’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘मजबूर’, ‘महल’, ‘पारस’ यांसारख्या अनेक सिनेमात काम केलं आहे.

0 8 9 4 7 1
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *