महेश नवमीच्या पवित्र सणानिमित्त मेहकर शहरात महेश नवमी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. या पवित्र सणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, क्रीडा मध्ये क्रिकेट, बुद्धिबळ, कॅरम , चित्रकला स्पर्धा, संगीत खुर्ची, नाण्यांपासून शिवलिंग बनवणे.
महेश नवमीच्या दिवशी सकाळी ओंकारेश्वर संस्थान, लक्कडकोट येथे महादेवाचा अभिषेक करण्यात आला. दुपारी ३ वाजता वाजत गाजत,फटाकयाच्या आतिशबाजीत ,माहेश्वरी युवा,महिला,पुरुषा च्या उत्साहमही वातावरनात भारतीय ज्ञानपीठापासून बालाजी मंदिर मार्गे शोभा यात्रेची सुरुवात होऊन ओंकारेश्वर मंदिरात आरती करून महेश सेलीब्रैशन येथे सांगता झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.गोविंद झंवर, प्रमुख पाहुणे विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटनेचे अध्यक्ष मा. सीए श्री.दामोदरजी सारडा, तालुकाध्यक्ष श्री.मनोज मंत्री, निलेश लाहोटी, विजय राठी सर, योगेश सारडा, सौ विजया सोनी व्यासपीठावर उपस्थित झाले.
डॉ. सुभाष भुतडा जितेंद्र चरखा, मंगेश राठी, संतोष राठी, यश गट्टाणी, श्याम राठी, सौ ज्योती मंत्री यांनी मंचावर बसलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.
महेश भगवान प्रतिमे समोर प्रथम दिवा प्रज्वलित करण्यात आला . सौ श्रद्धा बिर्ला यांनी स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले. महेश वंदना 18 महिलांनी अतिशय सुंदर सादर केली.
10 वर्षांहून अधिक काळ राहणार्या संयुक्त कुटुंबाचा प्रमाणपत्र आणि शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला, तसेच दोनपेक्षा जास्त अपत्य असलेल्या मातांचाही प्रमाणपत्र व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला, अंत्यसंस्कार सेवा देणार्याचा प्रमाण पत्र व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला , खेळ समाविष्ट क्रिकेट, बुद्धिबळ, कॅरम प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले . महिलामध्ये,संगीत खुर्ची, नाण्यांपासून शिवलिंग तयार करणे, चित्रकला स्पर्धा यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना प्रमाणपत्र व शिल्ड देऊन गौरविण्यात आले.
माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश नवमी उत्सव समितीच्या वतीने प्रमुख पाहुणे प्रदेशाध्यक्ष श्री दामोदरजी सारडा यांचे स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला तर तरुणांनी बालाजीची प्रतिमा देऊन सत्कार केला .
प्रदेशाध्यक्ष दामोदरजी सारडा यांनी आपल्या भाषणात जीवन यशस्वी कसे करायचे याच्या छोट्या छोट्या गोष्टी व उदाहरणे सांगून खास शैलीत सर्वांचे लक्ष वेधले व युवक व महिला संघटनांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.गोविंद झंवर यांचे भाषण झाले, प्रास्ताविक जितेंद्र चरखा यांनी केले , संचालन डॉ.पवन मंत्री व सौ ज्योती मंत्री यांनी केले, आभार डॉ.निलेश गट्टाणी यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तसेच शोभा यात्रेला विशेष रूप देण्याकरिता महेश सेवा समिती, युवा संघटन, माहेश्वरी महिला मंडळ , माहेश्वरी मंडळ तसेच विशाल काबरा ज्यांनी भारतीय ज्ञानपीठचे प्रांगण दिले, शारंगधर मंदिर मध्ये गेट-टुगेदर ग्रुप आणि बुलढाणा अर्बन यांच्या माध्यमातून शीतपेयाचे वितरण करण्यात आले तसेच महेश सेलिब्रेशन मेहकर मध्ये महेश अर्बन मेहकर चे वतीने सर्वांना आइस्क्रीमचा वाटप करण्यात आला तसेच महेश सेलिब्रेशन हॉल आणि तिथली बिछायत व्यवस्था डॉ. सुभाष लोहिया तसेच डॉ. पवन मंत्री यांनी दिली या कार्यक्रमाचे शोभा वाढावी म्हणून डॉ.सुभाष भुतडा महेश नवमी तालुका संयोजक, जितेंद्र चरखा अध्यक्ष महेश सेवा समिती, महेश गट्टाणी, विनोद मानधने, राजू भन्साळी, संतोष राठी, श्याम बियाणी, गौरव झंवर, दयाल काबरा, मंगेश राठी, आकाश सारडा, रमेश मुंदडा, मदन मुंदडा, संतोष तोष्णीवाल, राजेश चरखा, दत्तूप्रसाद बीयाणी,वसंत चरखा, विनोद लाहोटी, प्रमोद लाहोटी, यश गट्टानी, हरीश चरखा, आदित्य राठी, श्याम राठी, गोपाल राठी, रूपेश राठी आदी सर्व समाज बांधवानी प्रयत्न केले