गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
मंठा पोलीसांची पुर्णा नदि पात्रातुन अवैध रेती उत्खनन करणा-या जेसीबी चालक व मालकावर गुन्हा दाखल करुन कार्यवाहीमंठा तालुक्यातील तळणी शिवारात उप निरीक्षक बलभिम राऊत व त्यांच्यासोबत असलेला स्टाप हे पेट्रोलिंग करत असताना फौजदार राऊत यांना माहती मिळाली कि, देवठाणा उसवद येथे पुर्णा नदि पत्रात एक जेसीबी अवैध रेती चोरी करण्याच्या उद्देशाने उत्खनन करत आहे. वरील माहिती मिळताच फौजदार बलभिम राऊत यांनी सदरची माहिती पोलीस निरीक्षक रविंद्र निकाळजे यांना देवुन त्यांच्या मार्गर्शनाखाली देवठाणा उसवद येथिल पुर्णा नदी पात्रात जावुन रात्री 01.00 वाजेच्या दरम्यान पाहणी केली असता तेथे एक जेसीबी अवैध रेती उत्खनन करताना मिळुन आला सदर जेसीबीकडे जात असताना जेसीबी चालक जेसीबी जाग्यावर सोडुन पोलीसांना पाहुन पळुन गेला. त्या जेसीबीची पाहणी केली असता सदर जेसीबी हा पिवळ्या रंगाचा ज्याचा आरटीओ पासिंग क्र. एमएच 28 बीओ 6651 असा मिळुन आल्याने सदर जेसीबी ताब्यात घेवुन पोलीस ठाणे मंठा येथे जावुन सदर जेसीबी चालक पांडुरंग भगवान देशमुख रा. देवठाणा ता. मंठा जि.जालना व जेसीबी मालक नरेंद्र पंजाबराव पवार रा. देवुळगाव साक्रसा ता.मेहकर जि. बुलढाणा यांच्याविरुद्ध पोलीस ठाणे मंठा येथे उप निरीक्षक बलभिम राऊत यांच्या फिर्यादीवरुन आरोपीविरुदध गुन्हा दाखल करुन अंदाजे 27,00,000/- रु किमतीचा जेसीबी जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रखमाजी मुंढे हे करत आहेतसदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अजकुमार बन्सल साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी साहेब, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी परतुर श्री. सुरेश बुधवंत साहेब, मा. पोलीस निरीक्षक रविंद्र निकाळजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार बलभिम राऊत, पोहेकाँ/ सुभाष राठोड, रखमाजी मुंढे, मनोज काळे, पांडुरंग लिंबाळकर, सतिष आमटे, श्रीकांत काळे, विजय जुंबडे, मांगीलाल राठोड, आसाराम मदने यांनी केली आहे.
Users Today : 56