मध्यरात्री १२ वाजता बुलढाणा दणाणलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य आतषबाजी

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा :

धर्मवीर छत्रपती Chhatrapati Sambhaji Maharaj यांच्या जयंती उत्सवानिमित्त मध्यरात्री ठीक १२ वाजता बुलढाणा शहरात भव्य फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या नेत्रदीपक सोहळ्यामुळे संपूर्ण शहर काही काळासाठी उजळून निघाले.

हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत झालेल्या या जल्लोषात “जय भवानी… जय शिवराय… जय शंभूराजे…” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. संपूर्ण शहरात भगव्या वातावरणाची छटा दिसून आली.

या कार्यक्रमाचे आयोजन मागील अनेक वर्षांपासून सातत्याने करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. शिवभक्तांच्या मोठ्या उपस्थितीमुळे हा सोहळा अधिकच भव्य आणि लक्षवेधी ठरला.

आतषबाजीदरम्यान नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. धर्मवीर संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग आणि धर्मनिष्ठेचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांना अभिवादन केले.

हा सोहळा शिवभक्तांसाठी उत्साह, अभिमान आणि ऐतिहासिक जाणीव जागवणारा ठरला.

0 9 7 1 6 0
Users Today : 13
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *