घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी वाळू मिळाली तहसीलदार जोंधळे मॅडम यांचे धन्यवाद व याचे श्रेय सर्वसामान्य जनतेला मी केवळ निमित्तमात्र – दवणे यांची प्रतिक्रिया

Khozmaster
2 Min Read

गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
मंठा शहरांमध्ये केंद्र शासन व राज्य शासनामार्फत सर्वसामान्य नागरिकांना आपल्या हक्काचे घर मिळावे याकरिता प्रधानमंत्री आवास योजना ,रमाई आवास योजना, शबरी आवास योजना अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना गेले काही वर्षापासून वाळू मिळत नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी व मुख्यतः नगरसेविका सौ यमुना शेषनारायण दवणे व त्यांचे पती शेषनारायण दवणे यांनी वारंवार तहसील कार्यालय तसेच नगरपंचायत कार्यालय यांना निवेदनाद्वारे शहरातील बांधकामे सुरू असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वितरण करावे याकरिता अनेक वेळा मागणी केली परंतु शासनाने त्याचे कुठलीही दखल घेतली नाही अखेर नगरसेविका यमुना शेषनारायण दवणे व शेषनारायण मधुकरराव दवणे असंख्य लाभार्थ्यांसह नगरपंचायत प्रशासन व तहसील प्रशासन यांच्या विरोधामध्ये उपोषणाचे आंदोलन छेडण्यात आले दिनांक 06 जून 2024 रोजी शेकडो लाभार्थ्यांसोबत नगरपंचायत कार्यालय समोर उपोषण सुरू झाले.

अवघ्या सहा तासांमध्ये प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन मोफत वाळू वितरित करण्याचे मान्य केले.

सदरील घरकुल लाभार्थ्यांना वाळू ही ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत होती नगरसेविका दवणे यांनी ऑफलाइन पद्धतीने वाळू देण्यात यावी अशी मागणी आपल्या निवेदनामध्ये ठेवण्यात आली होती मंठा तहसील कार्यालयाच्या तहसीलदार श्रीमती सोनाली जोंधळे मॅडम यांनी दवणे यांच्या मागणीची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला व आज सुमारे 250 ते 300 लाभार्थ्यांना मोफत वाळू वितरित करण्यात आली अद्याप सुद्धा वाळू वितरित करणे असल्याने घरकुल लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे नगरसेविका सौ.यमुना शेषनारायण दवणे व शेषनारायण दवणे यांना घरकुल लाभार्थ्यांनी धन्यवाद देत मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे मॅडम यांचे देखील आभार व्यक्त केले.

यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दवणे यांनी सांगितले की सदर लाभार्थ्यांना वाळू मिळाली ते तहसील प्रशासन तहसीलदार सोनाली जोंधळे मॅडम यांच्या सकारात्मक प्रतिसादाने हे शक्य झाले व एक प्रकारे या उपोषणाला यश प्राप्त झाले असून याचे संपूर्ण श्रेय हे घरकुल लाभार्थी सर्वसामान्य जनतेचे असून मी केवळ निमित्तमात्र आहे अशी प्रतिक्रिया यावेळी दवणे यांनी दिली राहिलेल्या घरकुल लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या हक्काची वाळू हस्तगत करावी व नगरपंचायत मंठा येथून पावती घ्यावी असे आवाहन सुद्धा दवणे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

0 9 4 6 4 1
Users Today : 55
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *