लोणार शहरातून चोरटी अवैध रेती वाहतूक जोमात सुरू ! तहसीलदार मंडळ अधिकारी यांचे वरदहस्त ! महसूल अधिकाऱ्यांचे रेती माफी अशी लागेबंध !.

Khozmaster
3 Min Read

विशेष प्रतिनिधी- तानाजी मापारी /जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील रेती घाटाचा लिलाव नऊ जून रोजी समाप्त झाला आहे. परंतु याच परिसरातून नदीपात्रातून सोरटी अवैध रेती वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रेती माफियाना महसूलचा कोणताही दरारा उरला नाही. मंठा तहसीलदार तसेच लोणारचे तहसीलदार याकडे पाठ फिरून निमुटपणे बघत आहेत. जालना व बुलढाणा जिल्ह्यातील रेती माफी यांचे लागेबांधे लोणार मंठा तालुक्यात महसूल अधिकाऱ्यांची घनिष्ठ आहेत. मागील दोन महिन्यातील सतत सुरू असलेल्या अवैध चोरटी रेती वाहतूक कारवाई मध्ये घडलेल्या तफावती दरम्यान अनेक वेळा हे समीकरण पुढे आलं आहे. रेती वाहतुकीस रात्रीच्या दरम्यान प्रतिबंध असतो मात्र लोणार आणि मंठा तालुक्यामधून रात्रीच खेळ चाले अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात शेकडो वाहनांमधून आजमितिला सुद्धा सुरू आहे. लोक चर्चेनुसार या प्रकरणात महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी यांची आर्थिक लागेबांधे आहेत. वसुली करण्यासाठी महसूल विभागातील काही तलाठी मंडळ अधिकारी यांना या रेतीमाफीयांच्या टोळी सोबत अनेक वेळा सर्वसामान्य जनतेने स्पॉट केलं आहे. लोणार शहराच्या हद्दी मधून वाशिम बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा करून चोरटी वाहतूक करणारे टिप्पर सुसाट वेगाने धावत असताना आज सुद्धा निदर्शनास येतात.

याप्रकरणी तहसीलदार यांना अनेक लोकांनी अवैध रेती उपसा तसेच चोरटी रेती वाहतूक त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे परंतु संबंधित महसूल प्रशासनाने तसेच तहसीलदार जोशी यांनी कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली नाही. केवळ दंडात्मक कारवाईचा बडगा उभारत आपल्या आर्थिक वसुलीचा पायाभरणी कसा करता येईल याकडेच त्यांचे लक्ष वेधले आहे अशा प्रकारची सुप्त चर्चा जनसामान्यात पसरली आहे.
अवैध रेती उपसा करत चोरटी वाहतूक करणाऱ्या रेतीमाफीयांकडे कोट्यावधी रुपयाची मायपुंजी जमा झाली आहे त्यामुळे निर्धास्तपणे सुसाट वेगात वाहतूक करणाऱ्या या रितीमाफी यांना सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेची सुद्धा कोणत्याही प्रकारची काळजी नाही त्यामुळे होणाऱ्या अपघातात मृतकांची तसेच आजीवन अपंगत्व येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कूच कामे ठरलेल्या वाहन परिवहन विभाग पोलीस यंत्रणा आणि महसूल विभागाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगण्यात यामधील मंठा लोणार तालुक्यातील तहसीलदार, ठाणेदार ,वाहन परिवहन मंडळाचे अधिकारी यांचा मोलाचा वाटा आहे.
अर्थातच एवढ्या मोठ्या प्रमाणात नदीपात्रामधून अवैद्रता उपसा सुरू असताना त्यांची चोरटी वाहतूक रात्री उशिरा सुरू असते त्यामुळे रात्र जास्तीवर असलेल्या पोलिसांच्या भूमिकेकडे सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. औपचारिक पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई होण्याची आवश्यकता आहे. एव्हाना वाहतुकीच्या नियमावर बोट ठेवत सर्वसामान्य नागरिकांना त्रस्त करणारे वाहतूक पोलीस रेतीमाफीच्या वाहनाकडे पाठ फिरवून कर्तव्यात कसूर करताना आढळून येतात. यामुळे अशा पोलीस कर्मचारी यांच्यावर सुद्धा कारवाई होण्याची मागणी जनतेमधून केली जात आहे.
चौकट
थोडे दिन बाकी रिटायरमेंट के ..चैन से रिटायरमेंट चाहता हु…
लोणार तालुक्यातील तहसीलदार यांचे निवृत्तीचे थोडे दिवस बाकी आहेत त्यामुळे निवांत निवृत्ती घेण्याची त्यांची अपेक्षा आहे असे करत असताना आपल्या कर्तव्याला बगल देत अर्थपूर्ण हितसंबंध जोपासत रेतीमाफीयांना अभय देण्याचे काम वर्तमान तहसीलदार करीत असल्याचे जनतेत चर्चा आहे

0 6 6 8 7 3
Users Today : 31
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *