तळीरामांना अभय..! ग्रामपंचायत चा गलथान कारभार
का.प्र. मेहकर तालुक्यातील कल्याण ग्रामपंचायत नेहमीच चर्चेत असते या गावातील राजकीय पुढार्यांच्या आंदोलनाची चर्चा मुंबईपर्यंत दखल घेणे योग्य असते परंतु गाव पातळीवर आणि ग्रामस्थांना विविध समस्याचा सामना करावा लागत आहे ग्रामपंचायतच्या गलथान नियोजनाची चर्चा सर्वत्र पसरत आहे.
अशातच एक नवीन प्रकार घोडके साला आहे ग्रामपंचायत आवारामध्ये देशी विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्या खचाखच साचलेल्या आढळून आल्या आहे त्यामुळे ग्रामपंचायत आवारात परिसरातील तळीरामांना अभय दिले जाते काय हा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
शासकीय इमारतीच्या आवारात अशा प्रकारे दारू प्राशन करणाऱ्या तळीरामांमुळै ग्रामस्थांना प्रचंड त्रास होत आहे याकडे ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देईल का हा प्रश्न मात्र जनसामान्यांना भेडसावत आहे
कल्याणा ग्रामपंचायत आवारात दारुच्या बाटल्याचा ढिग
Leave a comment