गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
जालना नांदेड हायवे वर मंठा शहरातील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाला समोर दिवसा ढवळ्या महिलांच्या गळ्यातील पाच तोळयचे गंठण. हिसकावून घेणारे आरोपींना मंठा शहरातील जागृत नागरिका मुळे आरोप परतुर जवळ मापेगाव शिवारात धरले
पतीसोबत दुचाकीने जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील पाच तोळ्यांचे गंठण हिसकावून दुचाकीवरील दोघांनी आर्ध गंठण महिलेच्या गळ्यातच राहीले व अर्ध गंठण आरोपींनी घेऊन पळ काढला. माहिती मिळताच दोन तासांत मंठा पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही चोरट्यांना पाठलाग करून परतूर येथील मापेगाव शिवारात पकडले. शिवराज शहाजीराव सोळंखे यांच्या फिर्यादीवरून मंठा पोलिसांत दोघांवर गुन्हा
दाखल झाला.
मंठा येथील शिक्षिका वंदना सोळंखे पती व मुलीसह रविवारी तळणी फाट्यावरील सरस्वती मंगल कार्यालयात साक्षगंध समारंभात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. घरी परत येत असताना मंठा – जालना महामार्गावरील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या समोर दोन अनोळखी तरुणांनी दुचाकीवर त्यांचा पाठलाग करून त्यांच्या गळ्यातील पाच
तोळ्याचे गंठण चालू गाडीमध्ये ओढून पळ काढला. यामुळे शिक्षिका वंदना सोळंखे गाडीवर पडून जखमी झाल्या. दरम्यान, पोलिस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बलभीम राऊत, पोहेकॉ एस. पी. राठोड, जगन्नाथ सुक्रे, मनोज काळे, आसाराम मदने आर्दीनी आरोपींचा पाठलाग करत परतूर तालुक्यातील मापेगाव शिवारात दोन्ही गंठण हिस्सकावणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या मदतीने मंठा पोलिसांनी ताब्यात घेतले.
Users Today : 34