गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा
दिंडी महामार्गांवरील नायगाव टोलनाक्यापासून केहाळ वडगाव, माळेगावं, जयपूरकडे जाण्याऱ्या रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणि साचून आहे खड्ड्याच्या खोलीचा अंदाज लागत नसल्यामुळे हा खड्डा सद्यस्थीत जीव घेणा ठरत आहे रात्री बेरात्री वाहन धारकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्यामुळे सतत अपघात घडून येत आहेत .हा मार्ग नागरिकांच्या जीवावर उठला की काय?असे चित्र निर्माण झाले आहे.एवढे असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी मुकदर्शक झाले आहे.
या मार्गांवरून तालुक्यातील शेवटच्या टोकावरील वझर सरकटे, भुवन,पोखरी केंधळी, बेलोरा, शिवनगिरी,एरंडेश्वर, जयपूर, माळेगाव, केहाळ वडगाव या गावांतील तालुक्याला जाण्यासाठी महत्वाचा मार्ग असल्यामुळे वाहनांची वर्दळ असते व्यावसायीक, मजूर, शेतकरी, विद्यार्थी येथून ये-जा करतात. त्यांना सुध्दा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर टोल नाक्या जवळ मोठा खड्डा पडल्याने प्रवाशांना जिव मुठीत घेऊन जावे लागते. याच ठिकाणी तीन व्यक्ती या खड्यात पडून अपघाताच्या घटना घडल्या आहेत.असे असूनही
सार्वजनिष्ठ बांधकाम विभाग रस्त्याची दुरुस्ती करण्यास पुढाकार घेताना दिसून येत नाही. या मार्गावर अपघाताची मालिका सुरु झाली आहे. नागरिकांना जिव मुठीत ठेवून प्रवास करावा लागत आहे. बांधकाम विभागाने त्वरित
दखल घेऊन रस्ता दुरुस्त करावा तसेच पहलेता खड्ढा बुजवून मोग्य उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.
🎆चौकट
रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रस्त्यावरून जाताना शेतकऱ्यांच्या बैलगाडीला कसरत करावी लागत असल्याचे वास्तव आहे. या रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन
रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी.
– प्रल्हाद नाईक , म.न. से कार्यकर्ता
–
🎆चोकट
‘केहाळ वडगाव पुलापासून ते टोल नाका हे १.५ कि.मी. अंतर असलेल्या रस्ता दुरुस्तीचे काम अनेक वर्षापासून रखडलेली आहे. या मार्गावरून तालुक्याचे ठिकाण असलेल्या मंठा या गावांना जोडणारा रस्ता असून या मार्गावरून ये-जा करणाऱ्या शाळकरी विद्यार्थी, नागरिकांना, शेतकऱ्यांना, कर्मचाऱ्यांना रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे कमालीचा त्रास सहन करावा लागतो आहे. या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. तेव्हा संबंधित विभागीय अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन खड्डे बुजवून रस्ता रहदारी योग्य करावा.
ज्ञानेश्वर काकडे.ग्रा.पं.स. जयपुर
Users Today : 54