मॅडम निदान वर्दीचे तरी मोल राखणार ..?
कार्यालय प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यातील जागतिक ख्याती असलेल्या लोणार शहरातून सुरू असलेल्या अवैध उपसा करून चोरटी वाहतूक करणाऱ्या रेतीमाफीयांनी आपला धबधबा कायम ठेवला आहे. मंठा येथील महिला तहसीलदारांना वेठीस धरत त्यांच्यावर हल्ल्याचे प्रयत्न त्यांच्या चालकांना मारहाण करणे, अश्लील शिवीगाळ करणे मेहकर तहसीलदार यांच्या घरावर पाळत ठेवून तहसीलदारांना चाकूची धमकी दाखवणे इथपर्यंतच मजल न थांबता त्यांनी आरटीओ अधिकाऱ्याला न जुमानता त्यांच्या समक्ष बिनधास्तपणे अवैध रेती वाहतूक करून जणूकाही प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या दावणीला बांधलेली असल्याचे सबळ पुरावे दिले आहेत.
याबाबत सविस्तर असे की, बुलढाणा जिल्ह्यातील आरटीओ अधिकारी एव्हाना रस्त्यावरून जात असताना गोरगरीब सर्वसामान्य लोकांच्या वाहनांना हात देऊन वाहन संबंधी कागदपत्र तपासणी करताना आढळून येतात. कोणत्याही एका कागदपत्राची पूर्तता नसल्यास जणू काही विदेशी नागरिक अथवा मोठा समजलं असल्यागत त्या वाहन चालकाची चौकशी करून त्याचं मानसिक आर्थिक खच्चीकरण करण्यात येते, अर्थातच आपल्या प्रशासकीय सेवेचा हा एक भाग जरी असला तरी एवढी इमानदारी आणि कर्तव्यनिष्ठा रेतीमाफी या सोबत दर्शवताना हप्तेखोरी आडवी येत असणार याची शक्यता नाकारता येत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजेच माहेवारी आरटीओ कॅम्प लोणार येथील शासकीय विश्रामगृहामध्ये घेतला जातो असे असताना सुद्धा आरटीओ मॅडमच्या कॅम्प समोर दिवसभरात शेकडो अवैध रेती उपसा करून त्याची चोटी वाहतूक करणाऱ्या वाहनांना बिनधास्तपणे विजा करण्याची जणूकाही परवानगीच मॅडमनी दिलेली असते. लहान मोठ्या वाहनाच्या कागदपत्राची तपासणी करत असताना ओव्हरलोड विना नंबर तसेच ओवर स्पीड रेती वाहन कदाचित आरटीओ विभागाला दिसत नसतील म्हणजेच अदृश्य वाहनावर कारवाई करण्याची पद्धत प्रशासकीय यंत्रणा आज रोजी अद्यावत झालेली नसावी. त्यामुळेच कदाचित आरटीओ विभागाला आणि संबंधित अधिकाऱ्याला अशा प्रकारची वाहने जवळून जात असताना कदाचित दिसत नसावीत.
महसूल विभागाचे अर्थपूर्ण हितसंबंध
मंठा येथून नदीपात्रातील अवैध रेती उपसा करणारे शेकडो टिप्पर लोणार शहरांमधून चोरटी रेती वाहतूक करून वाशिम बुलढाणा जिल्ह्यात गावाच्या सव्वा भावात विक्री करत असताना महसूल विभागाची या वाहनावर दंडात्मक तसेच फौजदारी कलमानुसार गुन्हे दाखल करण्याची लोणार तहसीलदाराची ही भूमिका कायम संशयास्पद राहली आहे. थातूरमातूर कारवाई करून या रेतीमाफी यांना अर्थपूर्ण सहकार्य करण्याची लोणार तहसीलदारांची ही भूमिका लोणार मंठा परिसरात सर्वसामान्य जनतेत चर्चेची बनली आहे. आपल्या रिटायरमेंट ची पुढील जीवनाची आर्थिक खातर जमा करण्याचे काम लोणार तहसीलदार करीत असल्याचे रेतीमाफीया तसेच सर्वसामान्य जनतेत चर्चा आहे.
मंठा तहसीलदाराची दबंग कारवाई
रेतीमाफीया तसेच राजकीय पुढारी उठले जीवावर
लोणार पोलिसांची उदासीनता
जालना जिल्ह्यातील तहसीलदार मॅडम यांची दबंग कारवाईमुळे मंठा तसेच लोणार हद्दीतील रेतीमाफी यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. त्यांच्या अशा कारवाईमुळे रेतीमाफी या पुढारी पोलीस आणि महसूल प्रशासन त्यांच्या विरोधात काम करीत असल्याची सर्वसामान्य जनतेच्या चर्चा आहे. जालना जिल्ह्यात मंठा तालुक्याचा रेतीमाफीयांवर असलेला अंकुश कमालीचा आहे मॅडमनी केलेले दंडात्मक कारवाई जालना जिल्ह्यात नोंद घेण्यासारखी आहे. परंतु हे सर्व करत असताना स्थानिक प्रशासकीय यंत्रणा लोणार तहसीलदार आणि ठाणेदार यांच्याकडून तहसीलदार मॅडम यांना प्रशासकीय सहकार्य होत नसल्याचे जाणवते. सूत्राकडून प्राप्त माहिती नुसार मागील काळात रेतीमाफी यांनी तहसीलदार मॅडम यांच्या गाडीला अडवून त्यांच्यावर दबाव निर्माण केला होता अशा प्रकारे एका तहसीलदाराच्या जीवावर उठण्याचे कारस्थान यापूर्वी सुद्धा रेतीमाफियांनी केले आहे. अशा प्रकारचे गुन्हे सुद्धा मेहकर लोणार मंठा पोलीस स्टेशनला दाखल आहेत. केवळ पैसा कमावणे हेतू प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी यांनी आपसी मतभेद बाळगावा म्हणजेच सुपातील दाणे भरडताना ज्याप्रमाणे जात्यातील दाण्याला हसतात तोच प्रकार म्हणायला हरकत नाही.
प्रशासकीय यंत्रणे सोबतच राजकीय तसेच प्रसारमाध्यमातील अनेक लोकांना रेतीमाफी यांनी दिलेल्या धमकी वजा गर्भित इशाऱ्याची सुद्धा अनेक वेळा अनेक लोकांनी सोशल प्रिंट मीडिया मधून ही बाब जनतेसमक्ष उघडकीस आणली आहे.
महसूल, पोलीस ,आरटीओ ,राजकीय पुढारी यांना न जुमानता अरेरावी करत रात्रंदिवस नदीपात्रातून अवैध रेती उपसा करणाऱ्या पोलिसांच्या छातीवरून चोरटी वाहतूक करणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्याच्या समक्ष विना पावती तसेच विना नंबर प्लेट वर स्पीड ओव्हरलोड रेती वाहतूक करणाऱ्या या सर्व रेतीमासियांना देशात सर्वोच्च ठरणारा राष्ट्रपती पुरस्कार मिळायलाच हवा…?
हे म्हणणं वावगं ठरणार नाही तूर्तास एवढेच
लोणार रेतीमाफीयांचा बोलबाला आरटीओ अधिकाऱ्याची किंमत कवडीमोल…!
Leave a comment