बैलगाडा शर्यत
मेहकर शहराला राज्यात अलौकिक विजयश्री खेचून आणत पूणे, सातारा,फलटण यत्र तत्र सर्वत्र
फक्त रुबाबदार शरिरयष्टी, रुबाबदार सौंदर्य, रुबाबदारच कारकीर्द नावातच रुबाब अशा बैलगाडा शर्यत धावपटूचा दीर्घ आजाराने 12 जुलै 2024 रोजी करून अंत झाला…
मागील तीन वर्षापासून अख्ख्या महाराष्ट्रात विजयश्रीचा रुबाब ठेवत राज्यभर वावरणाऱ्या डौलाने सर्व शर्यती जिंकणाऱ्या ह्या रुबाबाची कार्य काही वेगळीच होती म्हणूनच तर आईने आपल्या लाडक्या लेखासाठी हंबर्डा फोडला मुलाने आपल्या भावासाठी समाधी बांधुन रुबाबाच्या रुबाबदार पुतळ्याचे अनावरण करणार असल्याचे सांगितले बहिणीची माया काही वेडीच असते रुबाबाच्या रक्षाविसर्जन प्रसंगी चेहऱ्यावरील त्या कोमल नैना मधून सतत अश्रूधारा वाहत होत्या अपार दुःख असलेले भराड परिवाराची त्या आश्रुमई चेहऱ्यानी उपस्थित सर्व प्राप्त स्वकीय मित्र परिवाराला हळवून सोडले…
मुक्या प्राण्यावर पोटच्या मुला इतपत प्रेम करावे अशा त्या मायेचा बाजार जेव्हा फुटत होता तेव्हा पोटात घालवल्यागत झाले हृदयाला बाजार पडणारा तो रक्ष विसर्जनाचा दुःखदमे प्रसंग जणू काही कौटुंबिक पोकळी कधीही न भरणारा ऐतिहासिक साक्ष देणारी कालचक्राची ही प्रचितीच होती व
पहेलवान ग्रुपचे मा.सभापती न.प. ओम सौभाग्य ,मोहन जाधव,या.नगरसेवक माधव तायडे ,नयन तायडे यांच्यासह शेकडो पैहलवान तेथे उपस्थित होते आपल्या लाडक्या रुबाबला शेवटची श्रद्धांजली अर्पण करीत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील अविस्मरणीय दुःख जणू रुबाब प्रति त्यांचं स्नेह प्रदर्शित करीत होता बालाजी अर्बनचे अध्यक्ष योगेश सौभाग्य यांची याप्रसंगी असलेली सजगता अनेकांना मोहत होती माळी पेठ वासियांचे दुःखद क्षणात सर्वकाही सामावून सांभाळून घेण्याची सामाजिक जाण सर्वांना मोहित करत होती.
मरावे परी किरकी रूपे उरावे या ओळीचे सार्थ ठरवणाऱ्या त्या मुक प्राण्याची जीवनगाथा यशोगाथाच आहे. रुबाब म्हणजे आयटीत धावणारा विक्रम नोंदविणारा महाराष्ट्र नव्हे तर दोन वेळा हिंदकेसरी हा किताब भूषविलेला गणेश भराड यांचा बैलगाडा शर्यतीतील धावपटू …
रुबाब बस नाम काफी है
आपल्या धन्याला राज्यभरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून देत सार्थ अभिमानाने स्वतःची व आपल्या धन्याची मान समाजात सतत उंचावत ठेवत प्रचंड मेहनत घेऊन पंचक्रोशीत नावलौकिक प्राप्त केले
भराड कुटुंबीयाचे ऐतिहासिक जीवनपटल रुबाबच्या आगमनाने उदयास आले रुबाची तीन वर्षाची कारकीर्द अतिशय मोलाची महत्त्वाची अभिमानाची रुबाब 12 जुलै रोजी दोन महिन्याच्या दीर्घ आजाराने कालवश झाला काही काळापुरता भराड कुटुंबीयांना मानसिक धक्काच बसला त्यामधून भराड कुटुंबीय निश्चितच सावरणार पुढील काळात रुबाब हा हृदयात कायम असणारा आहे यात तीळ मात्र शंका नाही परंतु त्यांनी रुबाबात थाटात केलेले आहे बैलगाडा शर्यतीला पुढे रुबाबच्या प्रतिष्ठेप्रमाणेच कार्यान्वित ठेवणे हीच खरी हिंदकेसरी रुबाबला रुबाबात अर्पण केलेली रुबाबदार श्रद्धांजली ठरणार आहे
पत्रकारिता क्षेत्रात विविध प्रकारच्या वृत्तांत वृत्तांकन करताना काहीसं मन. हे लावून टाकणारी अनेक दृश्य याची देही याची डोळा बघितली आहेत परंतु का मूक प्राण्याप्रती असलेली आपुलकी संवेदना आणि त्याच्या उपकाराप्रती परतफेडची भावना भराड कुटुंबीयाची प्रशासनीय आहे.
माझ्या कर्मभूमीतील अशा विराट अलौकिक नामांकन प्राप्त करणाऱ्या बैलगाडा शर्यतीतील हिंदकेसरी धावपटू रुबाब याला खोज मास्टर परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
मेहकर सारख्या शहराला आगळीवेगळी म्हणजेच बैलगाडा शर्यती ची हिंदकेसरी म्हणून नावलौकिक मिळवून देणाऱ्या महानपर्व रुबाब याला चव्हाण परिवाराच्यावतीने सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली