मेहकर विधानसभा मतदारसंघ मित्र पक्ष म्हणून रयत क्रांतीला सोडण्यात यावा ही कोअर कमिटीची मागणी..!

Khozmaster
2 Min Read

साधारण ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होतील या निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष रयत क्रांती संघटना याच्या मेहकर येथील पार पडलेल्या तालुका कोअर कमिटी च्या बैठकीत सर्वानुमते ठराव घेऊन विधानसभा मतदारसंघावर दावा करण्यात आला..

या लोकसभेच्या निवडणुकित विधानसभा मतदार संघात मिळालेली अल्प आघाडी महायुतीसाठी चिंतनीय विषय आहे.
शिवसेना पक्षाची झालेली फुट यातून मत विभागणी होऊन लोकसभेच्या निवडणुकीत अल्पशा मताची आघाडी मिळवण्यात समाधान मानावे लागले आहे.
रयत क्रांती संघटना महायुतीचा घटक पक्ष म्हणून युतीच्या स्थापनेपासून सोबत आहे गेल्या सहा टर्म पासून मेहकर विधानसभेवर सातत्याने भगवा फडकवण्याचा विक्रम शिवसेना पक्षाच्या नावावर आहे मागील सहाही निवडणुकीत विधानसभा निवडणुकीचा मताधिक्य वेळोवेळी वाढतच गेल्याने विक्रमी विजय मिळवण्यात यश आले..

पण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र अल्प म्हणजे केवळ 275मतांची आघाडी मिळवण्यात यश आले त्यामुळे अँटीइन्कमबन्सी हा फॅक्टर या मतदारसंघात दिसून आला आणि यावरून ही गोष्ट अधोरेखित झालेली दिसत आहे. त्यामुळे यावेळी अँटीइन्कमबन्सीचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो.

महायुतीचा घटकपक्ष असणाऱ्या रयत क्रांती संघटनेने मेहकर विधानसभा मतदारसंघात कोरोना काळात विविध आंदोलने करून विरोधी भूमिका बजावून ठाकरे सरकारला धारेवर धरण्याचे काम केले. रयत क्रांती संघटनेने शेतकरी प्रश्नावर विविध आंदोलने करून शेतकऱ्यांसाठी लढणारी संघटनातून नाव रुपाला आलेली आहे.
तसेच मतदार संघात विविध ग्रामपंचायतींवर रयतचा झेंडा फडकत आहे. संघटनेचे राज्याचे प्रवक्ते ॲड. जितू भाऊ आडेलकर यांच्या निवासस्थानी मेहकर विधानसभा प्रमुख पदाधिकारी तालुका कोअर कमिटीची बैठक संपन्न होऊन सदर बैठकीत सर्वानुमते ठराव संमत करून सदर मतदारसंघ रयत क्रांती संघटनेला सोडावा अशा आशयाची मागणी महायुतीकडे तसेच रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ. सदाभाऊ खोत यांच्याकडे करण्यात येणार आहे.

यावेळी तालुका अध्यक्ष गोपाल पाचपवार, किशोर चव्हाण, युवा तालुका अध्यक्ष आकाश मोसंबे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष धनराज राठोड, विधानसभा संपर्कप्रमुख महेश काळे सौ.मिना राहुल चव्हाण अध्यक्षा महिला आघाडी, विशाल तिवाले,धनराज घनवट, भारत अवसरमोल, संजय राठोड शेख मोबिन, दत्ता हाडे, सिध्दार्थ गव्हादे, रमेश शिरसाट, गजानन मर्दाने,संतोष लाटे, राधाकृष्ण पवार, दत्ता पवार, दुर्गादास नालिदे, गजानन आबेकर, विष्णु पवार, शकर लाटे, अबादास ढगे, शुभम चवरे, पंढरी गोरे, अशोक बगेआदी मान्यवर उपस्थित होते..!

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *