‘बिग बॉस मराठी’चा यंदाचा सीझन खऱ्या अर्थाने खास आहे. यंदाच्या सीझनमध्ये कित्येक नवे चेहरे चाहत्यांना पाहायला मिळाले. रीलस्टार सूरज चव्हाणने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या.
सूरज त्याच्या हटके स्टाइलने बिग बॉसच्या घरातून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे. त्याची झापुक झुपूक स्टाइल चाहत्यांनाही आवडत आहे. या झापुक झुपूक स्टाइलनेच सूरज बिग बॉसची ट्रॉफी घेऊन जाणार असल्याचं म्हणत आहे.
सूरजचा बिग बॉसच्या घरातील एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तो बिग बॉसच्या ट्रॉफीबद्दल बोलताना दिसत आहे. “शेवटी बिग बॉसची ट्रॉफी मीच नेणार”, असं सूरज अभिजीतला म्हणत आहे. त्यावर अभिजीत त्याला म्हणतो- “तूच घेऊन जा…तुझा हक्क आहे”. त्यानंतर सूरज म्हणतो की “खरंच घेऊन जाणारे…यांना कोणालाच हात लावून देणार नाही..”. सूरजला अभिजीत म्हणतो, “शेवटून पहिला आहेस तू…”. त्यानंतर सूरज त्याला म्हणतो- “शेवट आलो होतो शेवटच जाणार. ते पण ट्रॉफी हातात घेऊन…पहिलं खंडोबाला माझ्या पप्पांकडे जाणार. मग आई मरीमाताकडे जाणार…इच्छा पूर्ण होऊ द्या पप्पा…ओम नम: शिवाय”. त्यावर अभिजीत त्याला म्हणतो की होऊ दे तुझी इच्छा पूर्ण मग आम्हाला पण आनंद होईल.
Users Today : 21