♈ मेष (Aries)
आजचा दिवस प्रगतीचा ठरेल. कार्यक्षेत्रात मेहनतीचे फळ मिळेल. मात्र एखाद्या सहकाऱ्याच्या बोलण्यामुळे मन दुखावू शकते. लांबलेले सरकारी काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. जमीन-जुमल्याच्या व्यवहारात सावध राहा आणि आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.
♉ वृषभ (Taurus)
आजचा दिवस आनंदाचा असेल. घाईघाईत निर्णय घेणे टाळा. तुमची ऊर्जा आणि उत्साह वाढलेला राहील. कुटुंबातील एखाद्या सदस्याबाबतची चिंता दूर होईल. व्यापारासाठी प्रवास होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचा ताण कमी होईल.
♊ मिथुन (Gemini)
कामात निष्काळजीपणा करू नका. वडिलांशी मतभेद असतील तर शांतपणे चर्चा करा. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या, किरकोळ दुखापत होऊ शकते. बॉसच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका.
♋ कर्क (Cancer)
आज कुटुंबासोबत आनंदात वेळ जाईल. जीवनसाथीला प्रमोशन मिळाल्याची बातमी मिळू शकते. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. मात्र शेजारणीशी वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलताना संयम ठेवा.
♌ सिंह (Leo)
धाडस आणि पराक्रमाचे कौतुक होईल. मात्र स्वभावातील कडकपणा कमी ठेवा. अनोळखी लोकांपासून दूर राहा. कौटुंबिक समस्या वाढू शकतात, पण संयमाने सर्व ठीक होईल. मुलांना दिलेले वचन पूर्ण करावे लागेल.
♍ कन्या (Virgo)
आजचा दिवस फलदायी ठरेल. कामाच्या ठिकाणी किरकोळ वाद होऊ शकतो पण तो नंतर मिटेल. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. नवीन वाहन खरेदीचा योग आहे.
♎ तुळ (Libra)
अनावश्यक खर्च टाळा. एखाद्या सरकारी कामात अडचणी येऊ शकतात. देवाण-घेवाण प्रकरण कोर्टापर्यंत जाण्याची शक्यता आहे. घरात पाहुण्यांचे आगमन होईल आणि वातावरण आनंदी राहील.
♏ वृश्चिक (Scorpio)
आज एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होईल. त्यामुळे छोटेखानी पार्टीचे आयोजन होऊ शकते. पार्टनरशीप व्यवसायात फायदा मिळेल. व्यवसाय वाढवण्याचा मोठा प्लान तयार होऊ शकतो.
♐ धनु (Sagittarius)
व्यापारात मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. अडकलेले सरकारी काम पूर्ण होईल. मात्र प्रेयसीशी वाद होण्याची शक्यता, त्यामुळे संयम ठेवणे आवश्यक आहे.
♑ मकर (Capricorn)
आजचा दिवस यशस्वी ठरेल. मात्र घरात जोडीदारासोबत किरकोळ वाद होऊ शकतो. कुटुंबातील एखादा सदस्य आजारी पडू शकतो. धार्मिक कार्यात सहभागी होण्याचा योग आहे.
♒ कुंभ (Aquarius)
आज तुमच्या हातून परोपकाराची कामे घडतील. इतरांच्या वादात पडू नका. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद होऊ शकतात. पैशांची बचत करणे अत्यंत आवश्यक आहे.
♓ मीन (Pisces)
आज आवश्यक गोष्टींवरच खर्च करा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी जुन्या चुका समोर येऊ शकतात. राजकारणातील लोकांसाठी दिवस चांगला आहे.
Users Today : 26