‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या सुरू आहे. ‘बिग बॉस’ म्हटलं की ड्रामा, मनोरंजन, भावना आणि ट्विस्ट या सर्व गोष्टी आल्याच. ‘बिग बॉस मराठी’च्या अलिकडच्या भागात पहिल्यांदाच घरात दोन चिमुकल्या पाहुण्यांची एन्ट्री झाली.
या चिमुकल्या पाहुण्यांनी सदस्यांना निरागस सुखासह टास्कचे दु:खदेखील दिले आहे. घरातील काही सदस्य बाळाची सर्वोत्तम काळजी घेताना दिसून आले. पण आजच्या भागात भावनांच्या या खेळात सदस्य भावशून्य झालेले दिसून येणार आहेत. त्यामुळे आता ‘बिग बॉस’ काय पाऊल उचलणार हे पाहावे लागेल.
चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन होताच ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य त्यांच्यासोबत जोडले गेले. सदस्य या पाहुण्यांसोबत वेळ घालवताना दिसून आले. तर काहींनी या पाहुण्यांवरुन भांडणेदेखील केली. पण पाहुण्यांनी मात्र घरातल्या सदस्यांसोबत चांगला वेळ घालवला.
Users Today : 21