मुलाच्या प्रेयसीला पाहून वडिलांची मती फिरली; आधी जबरदस्ती लग्न केलं, त्यानंतर…

Khozmaster
2 Min Read

मीरपूर – वीटभट्टीत सुरू झालेल्या प्रेमकहाणीत प्रियकराचा बाप खलनायक बनून पुढे आला. वडिलाने आपल्याच मुलाच्या प्रेयसीसोबत जबरदस्तीनं लग्न केले. त्यानंतर या प्रेयसीला घरात बांधून पिता पुत्राने तिच्यावर अत्याचार केले.

मात्र तिथून कसंतरी सुटका झाल्यावर या युवतीने पोलीस ठाणे गाठत पिता पुत्राविरोधात गुन्हा दाखल केला. सध्या या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे.

उत्तर प्रदेशातील हमीरपूर इथल्या कोतवाली परिसरात सूरज कुमार हा वीटभट्टीवर काम करण्यासाठी गेला होता. त्याठिकाणी बांदा जिल्ह्यातील एक युवती तिच्या कुटुंबासह काम करत होते. याठिकाणी सूरज आणि युवतीमध्ये मैत्री झाली, हळूहळू त्याचे प्रेमात रुपांतर झाले. ही बाब युवतीच्या आई वडिलांना कळताच त्यांनी या दोघांच्या प्रेमाला विरोध केला. मात्र युवतीने आई वडिलांचे न ऐकता प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला.

वडिलांनी केलं जबरदस्ती लग्न

युवतीला तिच्या नातेवाईकांनी गावाला आणलं तर प्रेयसी घरी गेल्यानंतर वीटभट्टीवरील काम सोडून सूरजही त्याच्या गावी परतला. त्यानंतर एकेरात्री तो प्रेयसीच्या गावात पोहचला. सूरजनं युवतीचं अपहरण करून सोबत घेऊन गेला असा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला. मात्र मुलाच्या प्रेयसीला पाहताच प्रियकराच्या वडिलांची मती फिरली. त्याने एका मंदिरात मुलाच्या प्रेयसीसोबत जबरदस्ती विवाह केला. त्यानंतर लग्नानंतर पिता पुत्रांनी मिळून युवतीवर लैंगिक अत्याचार केले.

पिता पुत्रांनी युवतीला घरात बांधून ठेवले. खूप दिवस तिच्यावर अत्याचार केले. काही दिवसांपूर्वी संधी मिळताच युवती तिथून पळाली आणि घरी येऊन घरच्यांना सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी मुलीला सोबत घेत कोतवाली पोलीस ठाणे गाठले. त्याठिकाणी प्रियकर सूरज आणि त्याचे वडील तुलसीराम याच्याविरोधात तक्रार दिली. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. सध्या हे दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले.

0 9 3 8 5 4
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *