श्री चांगदेव विद्यालय नारायणडोहो गावातील वसतिगृहाच्या विद्यार्थींना शालेय गणवेशचे झेप फाउंडेशन पुणे यांच्या तर्फे वितरण:

Khozmaster
2 Min Read

कांता (भाऊ) राठोड 

15/08/2024 रोजी नगर तालुक्यातील नारायणडोहो गावातील श्री चांगदेव विद्यालयात 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला . नारायणडोहो येथील विद्यालयात मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी झेप फाउंडेशन पुणे (महाराष्ट्र राज्य )संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग संघटक- सचिव महाराष्ट्र प्रदेश, तथागत ग्रुप सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र प्रदेश महासचिव, युवा ग्रामीण पत्रकार संघ पश्चिम महाराष्ट्र उपविभाग प्रमुख, राज्य दैनिक बाळकडू, सेवाशक्ती वृत्तपत्र पत्रकार कांता ( भाऊ) राठोड व अहमदनगर जिल्हा सचिव कामिनी टकले मॅडम तसेच भैरवी सोशल फाउंडेशन पुणे,शाळेचे मुख्याध्यापक अकोलकर सर ,वसतीगृहाचे अधीक्षक धोंडे सर , सुनील म्हस्के सर यांच्या हस्ते शालेय गणवेश वाटप करण्यात आले.सुनील म्हस्के (संचालक) श्री शिवाजी मध्यवर्ती ग्राहक भांडार नगर अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज यांच्या हस्ते वसतिगृहातील विद्यार्थ्यांना

बॅट बॉल वाटप करण्यात आले.

तसेच कामिनी टकले मॅडम यांना झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष कांता (भाऊ)राठोड यांच्या हस्ते अहमदनगर जिल्हा सचिव पदी नियुक्तीपत्र व आदर्श माता सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

विद्यालयात स्वातंत्र्य दिन , दिनी विविध बक्षीसाचे वाटप ठेवीदारांनच्या( मान्यवरांच्या) हस्ते करण्यात आले त्यानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी अधिक्षक, मुख्याध्यापक, व शिक्षक सेवक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमा प्रसंगी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच ,उपसरपंच,ग्रामसेवक, सेवा सोसायटी, तलाठी भाऊसाहेब सदस्य, आदींसह विद्यार्थी ,शिक्षकवर्ग , माजी सौनिक शिक्षक , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *