राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज मंजूर झालेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे जामा होण्यास सुरुवात होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील लाभ लाडक्या बहिणींना कधी दिला जाईल याची नेमकी तारीख सरकारने सांगितली आहे. त्यामुळे या योजनेच्या रकमेची वाट पाहणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 31 जुलैपर्यंत अर्ज मंजूर झालेल्या महिलांच्या खात्यात महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ देण्यात आला आहे. दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रूपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याची रक्कम 1500 रुपये जमा होणार आहे. तसेच ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैनंतर म्हणजे 1 ऑगस्टपासून 31 ऑगस्टपर्यंत मंजूर झाले आहेत, त्यांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकत्रित 4500 रुपये जमा होणार आहे. त्यामुळे आता अर्ज मंजूर झालेल्या सर्व महिला सप्टेंबरमधील लाभाची वाट पाहत आहेत. हा लाभ कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता, त्याबाबत आता सरकारकडून माहिती देण्यात आली आहे.
दुसऱ्या टप्प्यात लाभ कधी मिळणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे अर्ज 1 ऑगस्टपासून अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात 31 ऑगस्टपासून पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. पत्रकारांशी बोलताना आदिती तटकरे यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी हस्तांतरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात ज्या महिलांनी 1 ऑगस्टपासून अर्ज केले आहेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 45 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
युद्ध पातळीवर अर्जांची पडताळणी सुरू
तसेच 31 जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हास्तरावर पडताळणी सूरू असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. जिल्हास्तरावर मंजूर झालेल्या अर्जाचा डेटा महिला व बाल विकास विभागाकडे येताच ती यादी बँककडे पाठवली जाईल. ही सगळी प्रक्रिया युद्ध पातळीवर सूरू आहे असे अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. दरम्यान अर्ज मंजूर झालेल्या महिलांना तसेच मेसेज येत आहेत. यानंतरत सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 2 कोटी 6 लाख 14 हजार 990 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 1 कोटी 47 लाख 42 हजार 476 अर्ज पात्र ठरले आहेत, तर 42 हजार 823 अर्जाची पडताळणी सुरु आहे.