बुलढाणा प्रतिनिधी :
सैलानी परिसरातून उपचारासाठी आणलेल्या एका अनोळखी वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधित व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसल्याने बुलढाणा पोलीस यांनी नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
माहितीनुसार, दि. ७ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास सैलानी येथून एका अनोळखी इसमाला उपचारासाठी सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे आणण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर संबंधित इसमास मृत घोषित केले.
मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही
सदर मृत व्यक्तीजवळ कोणतीही ओळख पटविणारी कागदपत्रे अथवा नातेवाईक आढळून आले नाहीत. त्यामुळे मृतदेह सामान्य रुग्णालय बुलढाणा येथील शवागारात ठेवण्यात आला आहे.
मृत व्यक्तीचे वर्णन
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे –
वय : अंदाजे ८० वर्षे
रंग : सावळा
उंची : अंदाजे ५ फूट ३ इंच
अंगात : पांढऱ्या रंगाचा शर्ट, पिवळ्या रंगाची टी-शर्ट, पांढरी पॅन्ट व निकर
उजव्या हातात लाल रंगाचा धागा
कमरेला पंचरंगी दोरा
नागरिकांना आवाहन
या व्यक्तीची ओळख पटल्यास किंवा त्याबाबत कोणाला काही माहिती असल्यास बुलढाणा पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र रोटे यांनी केले आहे.
📞 संपर्क : ९६२३२४३७३३
नागरिकांनी पुढाकार घेऊन माहिती दिल्यास मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध लागण्यास मदत होईल, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
Users Today : 24