‘एखाद्याचा बाप काढायची महाराष्ट्राची संस्कृती नाही..’; धनंजय पोवार गरजला, निक्कीची बोलती बंद

Khozmaster
1 Min Read

बिग बॉस मराठीच्या घरात प्रत्येक दिवशी नवीन राडे होताना दिसतात. कधी कधी इतरांना सुनावताना काही स्पर्धकांची जीभही घसरलेली दिसली. जान्हवीला यामुळे एक आठवडा जेलची शिक्षा भोगावी लागली.

परंतु तरीही काही सदस्यांच्या वागण्या-बोलण्यात सुधारणा झालेली दिसत नाही. बिग बॉसच्या घरात कालही निक्की तांबोळीची जीभ चांगलीच घसरलेली दिसली. तेव्हा DP दादाने तिच्यावर निशाणा साधत तिला सुनावलेलं दिसलं.

DP ने जान्हवीला दिली समज

काल जान्हवीने निक्कीला जेवण देणार नाही, असा ठाम पवित्रा घेतला होता. जान्हवीच्या या म्हणण्याला घरातील इतर सदस्यांनीही साथ दिली. त्यामुळे निक्कीचा चांगलाच पारा चढला. तिने बापावरुन एक वाक्य वापरलं, यामुळे गार्डन एरियात जेवण करत असलेला DP दादा भडकलेला दिसला. तो निक्कीला म्हणाला, “कोणाच्याही बापावर जाऊ नको. तो अधिकार तुला नाही. बापाबद्दल सगळेच इथे इमोशनल असतात. तू कोणाचा बाप काढू नको.” निक्की DP दादाला म्हणाली, “तुम्ही मला सांगू नका.”

0 8 9 4 5 5
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *