छावाचा जुना निष्ठावंत कार्यकर्ता श्री. विलास शास्त्री यांना दवाखान्याकरता ०१ लक्ष रुपयांची मदत…!
माझे खंदे समर्थक श्री. विलास शास्त्री हे त्यांचे छावा संघटनेपासूनचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते त्या काळामध्ये सर्व समाज बांधवांचा विरोध असताना सुद्धा विलासभाऊ सावलीसारखे भाऊंच्या पाठीशी उभे राहिलेले, आज त्यांची तब्येत अतिशय खराब असल्यामुळे ते संभाजीनगर येथे दवाखान्यांमध्ये ऍडमिट आहेत, त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे,परिवाराकडे त्यांच्या उपचाराकरिता देखील मुबलक पैसे नव्हते..!
त्यामुळे त्यांच्या मुलाने ताबडतोब माझ्या कानावर यांना ही घटना टाकली त्यानंतर मी ताबडतोब त्याला ऑफिसला बोलावून त्यांच्या दवाखान्यासाठी ५० हजार रुपयाची आर्थिक मदत केली,तसेच त्यानंतर उपचार सुरू देखील झाले..!
परंतु आज दिनांक- ०८ सप्टेंबर २०२४ रोजी पुन्हा दबत्या आवाजामध्ये त्यांच्या पत्नींचा तसेच मुलाचा मला फोन आला आणि त्यानी सांगितले की दादा तुमच्या भावाची तब्येत सिरीयस आहे, आणि मला मदतीची अत्यंत गरज आहे यावेळी मी क्षणाचा ही विलंब न करता त्यांना ऑफिसवर बोलावुन पुन्हा ५० हजार रुपये दिले तसेच ताबडतोबिने श्री. विलास शास्त्री यांना संभाजीनगर येथील हेडगेवार हॉस्पिटल मधून हलवून त्यांना पुढील उपचार करता जे.जे हॉस्पिटलला नेण्याची संपूर्ण व्यवस्था केली तसेच त्या ठिकाणी उपचार पूर्ण झाल्यानंतर ऑपरेशन करता हिंदुजा हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी देखील तेथील डॉक्टरांशी त्यांचे बोलणे करून दिले..
तसेच त्या हॉस्पिटल मधील उपचाराची देखील संपूर्ण जबाबदारी मीच घेतली, या घटनेनंतर श्री. विलास शास्त्री यांच्या पत्नी तसेच मुलांना अत्यंत गहिवरून आले होते त्यांनी मनोमन भाऊंचे आभार मानले आणि पुढील वाटचालीसाठी निघाले….!
Users Today : 37