मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सराईत गुन्हेगार असलेल्या टोळक्याने मारेकऱ्यांना गाठून त्यांच्यावर पिस्तूल रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार लोणीकंद परिसरात घडला. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून सात आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून १० लाखांचे सात पिस्तूल आणि २३ जिवंत काडतुसे जप्त केली.लाइन बॉय’ कुणाल पोळच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याच्या साथीदारांनी दोन हल्लेखोरांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. शुभम उर्फ अण्णासाहेब मॅटर अनिल जगताप (वय २७), सुमीत उत्तरेश्वर जाधव (वय २६), अमित म्हस्कु अवचरे (वय २७), ओंकार उर्फ भय्या अशोक जाधव (वय २४), अजय उर्फ सागर बाळकृष्ण हेडगे (वय २७), राज बसवराज स्वामी (वय २६) आणि लतिकेश गौतम पोळ (वय २२) अशी अटक आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रवींद्र गोडसे, कर्मचारी स्वप्नील जाधव, संदीप तिकोणे, कैलास साळुंखे, अजित फरांदे, सागर जगताप, अमोल ढोणे, शुभम चिनके, साईनाथ रोकडे, पांडुरंग माने, मल्हारी सुपरे, दीपक कोकरे आणि सुधीर शिवले यांनी कामगिरी केली.स्वारगेट पोलिस वसाहतीतील कुणाल पोळ आणि आरोपी विशाल सातपुते यांच्यात आर्थिक देवाणघेवाणीवरून वाद निर्माण झाले होते. या कारणावरून विशाल सातपुते आणि त्याच्या साथीदारांनी २०१५मध्ये पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा असलेल्या कुणाल पोळचा गोळ्या झाडून आणि हत्याराने वार करून निर्घृण खून केला होता. पोळच्या खुनाच्या आरोपाखाली आरोपींची कारागृहात रवानगी झाली होती.