पुणेकरांसाठी महत्त्वाचे! गणेशोत्सवानिमित्त ११ ते १८ सप्टेंबर ‘या’ रस्त्यांवर नो एंट्री, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Khozmaster
2 Min Read

शहरात गणेशोत्सव काळात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांना असुरक्षितता निर्माण होऊनये, यासाठी वाहतूक शाखेकडून ११ ते १८ सप्टेंबर दरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत शिवाजीनगरवरून स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक-जंगली महाराज रस्ता-टिळक चौक-टिळक रस्ता किंवा शास्त्री रस्त्याचा वापर करावा. तसेच, सिमला चौक-कामगार पुतळा चौक-शाहीर अमर शेख चौक-बोल्हाई चौक मार्गे नेहरू रस्त्याचा वापर करून स्वारगेटकडे जावे. या रस्त्याने गर्दीची परिस्थिती पाहून पीएमपीएल बसची वाहतूक वळविण्यात येणार आहे.चारचाकी वाहन चालकांनी नगरवरून स्वारगेटला जाण्यासाठी वारी मार्गाचा वापर करावा. चारचाकी वाहनांना गाडगीळ पुतळा ते शाहीर अमर चौक व पुढे नेहरू रस्त्याने स्वारगेटकडे जाता येईल. तसेच, जिजामाता चौक ते फुटका बुरूज येथून उजवीकडे वळून शनिवारवाड्यापासून नदीपात्रातील रस्त्याने भिडे पूल जक्शनवरून अलका चौक मार्गे इच्छितस्थळी जाता येईल.अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.बाजीराव रस्ता, केळकर रस्त्यावरील वाहनांनी अप्पा बळवंत चौक डावीकडे वळून बाजीराव रस्त्याने फुटका बुरूज मार्गे गाडगीळ पुतळा चौक उजवीकडे वळून जिजामाता चौक डावीकडे वळून गणेश रस्त्याने फडके हौद चौक, देवजीबाबा चौक उजवीकडे वळून हमजेखान चौक सरळ महाराणा प्रताप मार्गावरून गोविंद हलवाई चौक उजवीकडे वळून गोटीराम भैया चौक डावी वळून शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जावे.शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने टिळक चौक, टिळक रस्त्यामार्गे स्वारगटेकडे जातील.
शिवाजी रस्त्यावरून पुणे स्टेशन, हडपसरकडे जाणाऱ्या बसेस गाडगीळ पुतळा-कुंभारवेस, शाहिरअमर शेख चौक, बोल्हाई चौक, नेहरू रस्ता.

0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *