वैजापूर वासीयांनी केलेले सहकार्य व भरभरून दिलेले प्रेम मी कधीच विसरणार नाही-महक स्वामी

Khozmaster
2 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर ता,०८
कायदा आणि सुव्यवस्था  व जातीय सलोखा राखून
वैजापूरवासीयांनी जे सहकार्य केले व बंधूता पाळली ते कदापिही विसरता येणार नाही ,असे उदगार वैजापूर उपविभागाच्या सहायक पोलिस अधिक्षिका महक स्वामी यांनी रविवार(ता,०८)रोजी येथील पोलीस स्टेशनमध्ये आयोजित निरोप समारंभ प्रसंगी केले.महक स्वामी यांनी दोन वर्षांपूर्वी वैजापूर उपविभागाचा सहायक पोलिस अधिक्षिका म्हणून पदभार संभाळला होता,त्या आय,पी,एस, अधिकारी आहेत ,त्यांची नागपूरचे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झालेली आहे,त्या अनुषंगाने हा निरोप समारंभ
पोलीस स्टेशन ने आयोजित केला होता,त्यांच्या काळात वैजापूर शहर व परिसरातिल अनेक काळ्या धंद्यांना आळा बसला होता,सामाजिक सलोखाही जपल्या गेलेला आहे,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा पोलीस उप अधीक्षक
सुनिल लांजेवार होते,त्यांनी ही स्वामीच्या शिस्तप्रिय
कर्तव्य ची प्रशंसा केली,आ,रमेश पाटील बोरनारे, व माजी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांनी ही महक स्वामी यांचे कायदा व सुव्यवस्था बाबतच्या कर्तव्याची स्तुती केली,सामाजिक कार्यकर्ते ठा,धोंडीरामसिंह राजपूत,युवा सेनेचे आमीरअली,ज्योती हंगे,पो,नि, श्यामसुंदर कौठाळे,नितीन थोरात  यांनीही मनोगत व्यक्त केले,प्रास्ताविक विरगाव पोलीस स्टेशनचे स,पो,नि,एस, डी,वाघमोडे,यांनी केले,सूत्रसंचलन पो,कॉ, गीते यांनी केले आभार पो, कॉ,मेटे यांनी मानले.शहरातील पत्रकार,व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील संघटना,
महिला संघटना यांनीही महक स्वामी यांना बुके, व भेट वस्तू देऊन निरोप दिला.या प्रसंगी  शिवसेना शहर प्रमुख पारस घाटे,अखिल शेख,रियाज शेख, गणेश खैरे,सोनू राजपूत, काशिनाथशेठ गायकवाड, काशिनाथ भावसार,गौरव दौडे, मंजुषा ढाकरे, संतोषी लालसरे,रियाजुद्दीन शेख,काझी हाफीजोद्दीन, शकील कुरेशी, गोकुळ भुजबळ,ज्ञानेश्वर शिरसाट, बाबा धुमाळ,गौरव धामणे,यांच्या सह शहर व तालुक्यातील पोलीस पाटील,सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटना व मंडळाचे सदस्य यांची उपस्थिती होती.
(फोटो कॅप्शन-आ,रमेश बोरनारे  महक स्वामी यांना निरोप देतांना ,शेजारी उप जिल्हा पोलीस अधिक्षक सुनील लांजेवार,सौ,शिल्पा परदेशी व धोंडीरामसिंग राजपूत
0 9 4 6 4 2
Users Today : 56
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *