नवी दिल्ली : विनेश फोगटने आता पीटी उषा यांच्यावर तोफ डागत गंभीर आरोप केला आहे. मी हॉस्पिटलच्या बेडवर होती, तेव्हा त्यांनी नेमकं काय केलं, त्यावेळी कसं राजकारण त्यांनी खेळलं हे आता विनेशने सांगितले आहे. विनेशची एक खास मुलाखत झाली. या मुलाखतीमध्ये विनेशने या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. विनेशचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
विनेश फोगट जेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती, तेव्हा तिचा एक फोटो आला होता. त्यामध्ये तिला भेटायला पीटी उषा आल्याचे पाहायला मिळत होते. त्यामुळे सरकार विनेशबरोबर आहे, असे दिसत होते. पण त्यावेळी कसे राजकारण केले गेले, हे आता विनेशने सांगितले आहे. त्यामुळे पीटी उषा यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
पीटी उषा यांचा भाजपाशी संबंध आहे. विनेशने भाजपाच्या ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर विनेश ऑलिम्पिकला गेली. तिथे तिच्याबरोबर काय प्रकार घडला हे सर्वांनाच माहिती आहे. पण पीटी उषा यांनी त्यावेळी काय केलं, हे विनेशने सांगितले आहे. त्यामुळे आता पीटी उषा यांचे बिंग फुटल्याचे म्हटले जात आहे.
Users Today : 8