बकरी चोरीचा खटला, तीन पिढ्या बदलल्या, ३६ वर्षात सात जण दगावले, अखेर चक्रावणारा निकाल

Khozmaster
2 Min Read

कोर्टाची पायरी कधी चढू नये असं अनेकदा बोललं जातं. त्यामागे कारणंही तशीच असतात. याच आशयाचा एक प्रकार समोर आला आहे. ३६ वर्ष जुन्या एका प्रकरणात कोर्टाने प्रदीर्घ काळानंतर मोठा निर्णय दिला आहे. २५ जून १९८८ रोजी एका गावात चोरी आणि जाळपोळ झाली होती. या प्रकरणी कोर्टाकडून आता ऑगस्ट २०२३ मध्ये पाच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.बिहारच्या औरंगाबादमधून हे प्रकरण समोर आलं आहे. ३६ वर्षांपूर्वी २५ जून १९८८ रोजी बिहारच्या असलेमपूर गावातील राजन राय या व्यक्तीने पोलिसांत तक्रार दिली होती. १२ लोकांनी त्यांच्या घरात घुसून त्यांच्या दोन बकऱ्या पळवून नेल्या होत्या. राजन राय यांनी आपल्या बकऱ्या घेऊन जात असल्याचं पाहून त्या १२ जणांना विरोध केला. मात्र त्यांनी राजन यांना मारहाण करुन त्यांच्या घरालाही आग लावली, असल्याचा आरोप राजन यांनी केला.

पोलिसांनी हे प्रकरण दाखल करुन तपास सुरू केला. या घटनेच्या सुनावणीसाठी ३६ वर्षांचा काळ गेला. या काळात ७ आरोपींचा मृत्यू झाला. दोन आरोपींवर स्वतंत्र्य गुन्हा दाखल करण्यात आला. तर इतर पाच आरोपींविरोधात कोर्टात सुनावणी सुरू होती. ३६ वर्ष चाललेल्या या सुनावणीमध्ये अनेक जबाब नोंदवण्यात आले.

त्यानंतर १० ऑगस्ट २०२३ रोजी औरंगाबादचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधिश सौरभ सिंह यांनी या खटल्याचा निकाल दिला. त्यांनी या सुनावणीबाबत बोलताना सांगितलं, की ते आरोपींच्या विरोधात पुरेसे पुरावे समोर आणू शकले नाहीत. त्यामुळे कोर्टाने आरोपींना निर्दोष मुक्त केलं. कोर्टाचा हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे. यामुळे न्याय मिळण्यासाठी इतका लागणारा वेळ किती महागात पडू शकतो हे समोर येत आहे. मात्र आरोपींची सुटका झाल्यानंतर त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास होता, त्यामुळे सुनावणीसाठी मोठा उशिर झाला असला, तरी आम्हाला न्याय मिळाला असल्याचं ते म्हणाले.

 

0 6 2 3 5 8
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *