पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी ₹५०० कोटींचा ऐतिहासिक निधी मंजूर — छत्रपती संभाजीनगरात गौरव सोहळा

KHOZ MASTER
1 Min Read

छत्रपती संभाजीनगर :- जिल्हा प्रर्तीनिधी 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटी (PES), मुंबई ही संस्था आजही बाबासाहेबांच्या विचारांचा, शिक्षणाच्या ध्यासाचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या वाटचालीचा दीप प्रज्वलित ठेवत आहे.

या संस्थेच्या विकासकामांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून तब्बल ₹५०० कोटी रुपयांचा ऐतिहासिक निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर येथील पी.ई.एस. कॉलेज तर्फे माझा भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला.

या प्रसंगी प्राध्यापक, विद्यार्थी, नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानले.

या निधीच्या माध्यमातून केवळ नवीन इमारतीच उभारल्या जाणार नाहीत, तर ज्ञान, विकास आणि आधुनिकतेचा पाया अधिक मजबूत करण्याचे कार्य हाती घेण्यात येणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानयुक्त, प्रेरणादायी आणि उच्च दर्जाचे शैक्षणिक वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांना नवी दिशा देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

बाबासाहेबांनी दिलेलं शिक्षणाचं तत्त्व — शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा — हेच आमच्या प्रत्येक कृतीचं अधिष्ठान आहे,” असे यावेळी प्रतिपादन करण्यात आले.

सर्वांच्या सहकार्याने आणि विश्वासाने ही विकासयात्रा अधिक व्यापक, भव्य आणि उज्ज्वल होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *