भागवत गायकवाड यांना जिल्हा स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रधान

Khozmaster
2 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सावळदबारा   सहशिक्षक भागवत गजानन गायकवाड सर यांना जिल्हा स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रधान करण्यात आला.स्माईल एज्युकेशन अँड वेल्फेअर असोसिएशन छ.संभाजीनगर आयोजित व थिंक शार्प फाऊंडेशन पुणे यांच्या सौजन्याने जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा दिमाखदारपणे संपन्न झाला.
छत्रपती संभाजीनगर जिल्हाभरातील ९ तालुक्यातून प्रत्येकी एक शिक्षक,पदवीधर शिक्षक,मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समितीचा सन्मान सोहळा रविवार ८ सप्टेंबर 2024 रोजी देवगिरी महाविद्यालय , छञपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला होता.
      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण उपसंचालक  अनिल साबळे होते.तर प्रमुख पाहुणे  म्हणून आदर्श गाव योजनेचे जनक भास्करराव पेरे पाटील ,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.सुनील भोकरे ,थिंक शार्प फाउंडेशन पुणेचे संस्थापक संतोष फड ,राज्य आंग्ल भाषा संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता डाॅ.विशाल तायडे, अधिव्याख्याता नारायण पडूळ, उपशिक्षणाधिकारी निता श्रीमाळ,शिक्षण विस्तार अधिकारी रमेश ठाकूर ,शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश हिवाळे, शिक्षक भारती माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष अनिल देशमुख, स्माईल एज्युकेशनचे  मुख्य संयोजक त्र्यंबकेश्वर मोईन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रमुख अतिथी यांच्या हस्ते जिल्हा स्तरीय गुणवंत  शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला, यात  भागवत गजानन गायकवाड सर यांना सन्मानचिन्ह , प्रशस्तीपत्र, शाल , गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा सावळदबारा येथील सहशिक्षक भागवत गजानन गायकवाड यांनी ग्रामीण भागात केलेले शैक्षणीक कार्य, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, तयारी व शिष्यवृत्तीतील यश , शाळेची पट संख्या वाढ ,  विविध उपक्रमातील सहभाग , राष्ट्रीय निवडणूक कामातील सहभाग , उत्तम चारित्र्य, वर्ग , शाळा तंत्रस्नेही व डिजिटल करण्यासाठी केलेले प्रयत्न,सामाजिक कार्य या सर्वांच्या आधारे ना अर्ज ना शिफारस या तत्त्वानुसार त्यांची निवड करण्यात आली होती.
यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्व पुरस्कार प्राप्त गुणवंतांचे व स्माईल टीमचे अभिनंदन केले.
0 8 9 4 8 1
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *