पंतप्रधानांच्या घरी नवीन पाहुण्याचं आगमन, कुशीत घेत मोदींकडून लाड, नाव ठेवलं दीपज्योती..

Khozmaster
2 Min Read

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्याला कारणही तसेच आहे. ते पीएम हाऊसमध्ये गायीच्या वासरासोबत दिसत आहेत. पीएम नरेंद्र मोदी हे या वासराचा मोठ्या प्रेमाने लाड कराताना दिसत आहेत.

पंतप्रधानांनी सांगितले की त्यांनी या नवीन वासराला ‘दीपज्योती’ असे नाव दिले आहे. याआधीही पंतप्रधानांच्या निवासस्थानातून पंतप्रधान मोदींचे गायीसोबतचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. मात्र, पीएम मोदींचा या वासरासोबतचा नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे.सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत पीएम मोदी म्हणाले, ‘आपल्या धर्मग्रंथात म्हटले आहे – गाव: सर्वसुख प्रदा:’. लोककल्याण मार्गावरील पंतप्रधान गृह कुटुंबात नवीन सदस्याचे शुभ आगमन झाले आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी प्रिय गौ मातेने एका नवीन वासराला जन्म दिला असून, त्याच्या कपाळावर ज्योतची खूण आहे. म्हणून मी त्या वासराचे नाव ‘दीपज्योती’ ठेवले आहे.मकर संक्रांतीच्या दिवशी पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोदी अनेक गायींना चारा खाऊ घालताना दिसले आहेत. पीएम निवासस्थानी अनेक गायी आहेत. ज्यांच्यासोबत मोदी बऱ्याचदा वेळ घालवताना दिसतात.हे वासरु सामान्य गायीपेक्षा थोडे वेगळे आहे. हे वासरु पुंगनूर जातीचं असून ते आंध्र प्रदेशातील असल्याची माहिती आहे. त्याची उंची केवळ अडीच ते तीन फूट आहे. ही गाय अत्यंत पौष्टिक दूध देते. ही या जगातील सर्वात लहान गायी आहेत, त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. कदाचित त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गायींना त्यांच्या निवासस्थानी आणले आहे, जेणेकरून लोकांमध्ये या गायीबद्दल जागरुकता पसरावी, त्यामुळे सर्वसामान्यांनाही या गायीचे संरक्षण करता येईल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *