गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळावा यासाठी बाप्पा कडे साकडे घातले. त्यानंतर बेरोजगारी सारख्या समस्येवर काय उपाय करता येतील याविषयीचे माझे विचार गावकरी आणि तरुणांसमोर मांडले. याप्रसंगी ग्रामस्थांनी माझा आणि माझ्या बरोबर असणाऱ्या सर्व मंडळींचा सत्कार केला, यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो. यावेळी माझ्यासोबत कोनाटी विभाग प्रमुख साहेबराव पाटील, कृ.उ.बा.स. संचालक तेजराव घायाळ पाटील, लोणार तालुका विभाग प्रमुख स्वप्नील हाडे पाटील तसेच गजानन पालवे ही मंडळी उपस्थित होती.