नाशिक : पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे गंमत म्हणून एका परदेशी महिलेने रिक्षा चालवायला घेतली. मात्र त्यानंतर जे घडलं ते भयंकर होतं. कारण रिक्षा चालवत असताना तिने अचानक एका दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे घाबरलेल्या महिलेसह पाच परदेशी तरुणांनी नाशिकच्या दिशेने धाव घेतली. आता ते एका हॉटेलमध्ये ते सगळे जण लपून बसले असून पोलीस त्यांना ताब्यात घेण्याची तयारी करत आहेत.
काय घडलं नेमकं?
पुणे जिल्ह्यातील नारायणगाव भागात एका परदेशी महिलेने गंमत म्हणून रिक्षा दामटवली. मुख्य रस्त्याने प्रवास करत असताना रिक्षाने एका बाईकला धडक दिली. या अपघातात बाईकस्वार जागीच गतप्राण झाला. अपघात पाहून पाच परदेशी तरुणांची पाचावर धारण बसली. ते सगळे जण नाशिकला पळून गेले. तिथे पोलिसांनी महिलेला गाठलं, मात्र आरोपी ही परदेशी महिला असल्याने पोलिसांना कारवाई करताना अडचणी येत आहेत. परंतु पोलिसांनी ती राहत असलेल्या हॉटेलबाहेर बंदोबस्त लावला आहे.
दोन रिक्षांनी पाच परदेशी पर्यटकांची रपेट
दोन रिक्षांमधून पाच परदेशी पर्यटक नाशिकहून पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे निघाले होते. यावेळी एका दुचाकीला त्यांचा धक्का लागून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार बाळासाहेब ढेरे (रा. नारायणगाव) यांचा मृत्यू झाला.घाबरलेले पर्यटक नाशिकच्या दिशेने पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता एका खासगी हॉटेलमध्ये ते सर्व जण सापडले. मात्र महिला आरोपी असल्यामुळे ताब्यात घेण्यात अडचणी. पोलिसांनी नोटीस देण्यात आली आहे.
फेसबुक लाईव्ह चर्चेत
दरम्यान, दुसरीकडे नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या एका पथकात कार्यरत अंमलदाराने सोमवारी (दि. १६) दुपारी केलेले फेसबुक लाइव्ह शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. एका खात्यांतर्गत चौकशीमुळे त्रासल्याचा दावा करून अंमलदाराने पोलिस दलातील कार्यपद्धतीविरुद्ध भाष्य केले. त्याच्या चेहऱ्याला जखमा असल्याचे दिसत होते. अंमलदाराने व्हिडीओत केलेले दावे आयुक्तालयाने फेटाळले असून, हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्याने पोलिस दलातही चर्चा सुरू आहेत.
Users Today : 18