नाशिकमध्ये भाजप अन् ठाकरे गटात संघर्ष, पोलिसांचीही सत्वपरीक्षा; निवडणुकीच्या तोंडावर वादाची ठिणगी

Khozmaster
2 Min Read

नाशिक : लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे सलीम कुत्ता प्रकरण बाहेर आले होते. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटातील संघर्षाला भाजप विरुद्ध ठाकरे गट असे स्वरूप आले आहे.

सुधाकर बडगुजर, मुकेश शहाणेंत कलगीतुरा; पोलिसांची सत्त्वपरीक्षा

प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणावरून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि बडगुजर यांच्यात आता राजकीय संघर्ष सुरू झाल्याने नाशिकचे राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे. विशेष म्हणजे या दोन पक्षांतील संघर्षांत आता पोलिसांचीही कोंडी झाली असून, पोलिसांचा राजकीय वापर होत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत हा वाद धगधगता राहणार असल्यामुळो आता पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वीच प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणात बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात समोर आले. त्या प्रकरणात सुधाकर बडगुजर यांनी पोलिसांच्या कारवाईमागे राजकीय दबाव असल्याचे सांगत पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला. परंतु, या प्रकरणात पुन्हा आता सिडकोतील बडगुजर-शहाणे वादाने डोके वर काढले आहे. ठाकरे गटाच्या महिलांनी पोलिसांविरोधात आंदोलन केल्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांना बुधवारी रात्री फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी गुरुवारी सकाळी विजय गायकवाड नामक तरुणावर अंबड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. धमकी देणारा, तसेच अन्य दोघे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांची माणसे आहेत. त्यांच्या सांगण्यावरूनच आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप शहाणे यांनी केला. त्याला बडगुजर यांनीही जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. या घटनेमुळे सिडकोतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठिणगी

काही महिन्यांपूर्वी पवननगर भागात रात्री हवेत गोळीबार करण्यात आला होता. त्यात मुकेश शहाणेंचे नाव चर्चिले गेले होते. दोन-अडीच वर्षांपूर्वी ‘आरटीआय’ कार्यकर्ता

0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *