जामनेर;ऐन सणासुदीच्या तोंडावर खाद्य तेलाचे दर वाढल्याने ग्रामीण भागातील शेतकरी सामान्य जनतेला झळ बसणार आहे.शेतमालाला भाव नाही मात्र खाद्यतेलाच्या किमीती २५ ते ३० रुपये प्रति किलो ने महागल्याने सणासुदीच्या तोंडावर सामान्य शेतकी जनतेचे कंबरडे मोडणार आहे.
सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवर २० टक्के आयात शुल्क कारल्यामुळे.राज्यात खाद्य तेलाच्या किमती वाढल्या आहेत.एन सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाचे वाढलेले दर हे सोयगाव तालुक्यात ग्रामीण भागातील सामान्य जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या खिशाला झळ बसवणारे आहेत अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.एकीकडे शेतमालाचे भाव वाढायला तयार नाहीत मात्र दुसरीकडे सरकार खाद्यतेला सारख्या महत्त्वाच्या वस्तूच्या किमती वाढवण्यासाठी पोषक आसे निर्णय घेत असल्याने. सामान्य जनतेमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.सूर्यफूल पुर्वी ११५ रुपये किलो होते ते आज १३० रुपये झाले तर.सोयाबीन आदीचा दर ११० रुपये किलो होते आज १३० तर.शेंगदाणा आदिचा दर १७५ रुपये किलो होते आज १८५ रुपये झाले आहे. याप्रमाणे खाद्यतेलाचे दर वाढल्याने ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसणार आहे. या दरवाढीमुळे सरकारवर प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.