पुण्यातील गुंजवणी नदीत मृतदेह, हत्येचं रहस्य उलगडलं, पोलिस तपासात सर्वच स्पष्ट झालं

Khozmaster
2 Min Read

पुणे (भोर) : वेल्हे तालुक्यात गुंजवणी नदीपात्रामध्ये सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा झाला असून, अंधश्रद्धेतून हा खून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. करणी करत असल्याच्या संशयावरून गावातील तरुणानेच हा खून केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले.गणपत गेनबा खुटवड (वय ५२, रा. हातवे खुर्द) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व राजगड पोलिसांनी स्वप्नील ज्ञानोबा खुटवड (वय ३०, रा. हातवे खुर्द) याला ताब्यात घेतले आहे. गणपत यांचा रविवारी मृतदेह सापडला होता. त्यांच्या डोक्यावर जखम दिसून आली होती. त्या ठिकाणी मोटारसायकल व अन्य वस्तू सापडल्या होत्या. त्यामुळे, संदीप अरुण खुटवड यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी या प्रकरणाच्या तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर व राजगड पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी तपासाला सुरुवात केली.तपास पथकाने स्वप्नील याला खेडशिवापूर परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, गणपत यांचे रेशनिंग दुकान आहे. तसेच ते काळूबाई देवीचे देवऋषी असून करणी करतात. त्यामुळे आर्थिक प्राप्ती होत नसल्यामुळे स्वप्नीलला गणपत यांच्याबद्दल राग होता. घटनेच्या दिवशी गणपत रात्री घरी जाताना स्वप्नीलने त्यांचा पाठलाग केला. पुलावर अडवून त्यांच्या डोक्यावर दगडाने मारून खून करून मृतदेह नदीत टाकला व मोटारसायकल सुरक्षा कठड्याला अडकवली. हा अपघात असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न आरोपीने केला होता. पोलिसांनी स्वप्नीलकडे चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पुण्यातील तरुणीला फायनान्स कंपनीच्या पोराचे घाणेरडे मेसेज

दरम्यान, शिवसेनेचे नेते वसंत मोरे कोणत्या ना कोणत्या विषयावरील सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत राहत असतात. कधी पक्ष बदल करत, तर कधी नाराजी, नाट्यमय घडामोडीमुळे ते चर्चेत असतात. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवताना ते फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून थेट प्रश्न निकाली लावण्याच्या उद्देशाने अधिकारी किंवा संबंधित कर्मचऱ्याला धमकी दिल्याने चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी एक व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये काही महिला फायनान्स कंपनीच्या वसुलीदाराला चोप देताना दिसत आहे. तर वसंत मोरे समोर आपल्या खुर्चीवर बसून ते सगळं पाहता असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं आहे.

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *