BSNL युजर्सना ‘अच्छे दिन’, 35 हजार 4G साईट्स लाईव्ह, नेटवर्क होणार वेगवान

Khozmaster
2 Min Read

तुम्ही बीएसएनएलचे युजर्स असाल आणि तुम्हाला स्वस्त इंटरनेट हवं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण, तुमच्यासाठी आता ‘अच्छे दिन’ येणार आहेत. बीएसएनएलच्या 35 हजार 4G साइट्स लाईव्ह करण्यात आल्या आहेत. तसेच 7 हजारहून अधिक 4G मोबाइल टॉवर रोलआऊट पूर्ण झाले आहेत.

बीएसएनएलचे प्रत्येक गावात नेटवर्क

बीएसएनएलचे मोबाइल टॉवर भारतातील गावांना नेटवर्क पुरवण्याचे काम करतील. दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी जून 2025 पर्यंत 1 लाख 4G साइट्स लाइव्ह करण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत बीएसएनएलचे प्रत्येक गावात जाळे म्हणजेच नेटवर्क असणार आहे.

‘स्वस्त इंटरनेट पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न’

मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे म्हणणे आहे की, बीएसएनएल शहरांबरोबरच खेड्यांमध्येही नेटवर्क मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात स्वस्त इंटरनेट पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. केंद्रीय मंत्री शिंदे म्हणाले की, लाइव्ह 1 लाख 4G टॉवर्सद्वारे मोबाइल सेवा सुधारली जाईल. तसेच नवीन सेवा सुरू करण्यात येणार आहेत.

मोफत डेटा

बीएसएनएल 4G रोलआउटसह विनामूल्य 4G सिम अपग्रेड सुविधा देत आहे. जर तुम्हाला बीएसएनएल सिम हवं असेल तर तुम्हाला जवळच्या बीएसएनएल कार्यालयामध्ये जावं लागेल, जिथून तुम्हाला 4G बीएसएनएल सिम मोफत मिळू शकेल. सिम अ‍ॅक्टिव्हेट झाल्यानंतर कंपनी फ्री 4G बोनस डेटा देत आहे. त्यामुळे तुमचे सिम बीएसएनएलवर पोर्ट करण्याची हीच योग्य वेळ आहे. यामुळे तुम्ही फ्री 4G बीएसएनएल डेटासह फ्री डेटाचा आनंद घेऊ शकाल.

राजधानीत 4G चाचण्या

4G लॉन्च करून 5G नेटवर्क टेस्टिंग सुरू केली आहे. बीएसएनएल दिल्लीतील मिंटो रोड आणि चाणक्यपुरी येथे 5G चाचणी घेत आहे. बीएसएनएल दिवाळीपर्यंत देशभरात 5G चाचण्या चालवणार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, तेजस नेटवर्क, विहान नेटवर्क, युनायटेड टेलिकॉम, कोरल टेलिकॉम, एचएफसीएल, टायडल वेव यांसारख्या स्वदेशी टेलिकॉम कंपन्यांच्या मदतीने बीएसएनएल 5G नेटवर्क सुरू केले जात आहे.

सर्वात स्वस्त 4G आणि 5G सेवा

बीएसएनएल 5G नेटवर्क कमी विलंबात उत्कृष्ट कॉलिंग आणि इंटरनेट अनुभव देईल. यामध्ये एचडी व्हिडिओ स्ट्रीमिंग, गेमिंगचा समावेश आहे. याशिवाय बीएसएनएलकडून सर्वात कमी दरात 4G आणि 5G सेवा दिली जाऊ शकते.

0 7 4 0 6 3
Users Today : 67
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *