हर्षवर्धन पाटलांच्या अडचणीत भर; तुतारी हाती घेण्यात अडथळा; शरद पवार काय करणार?

Khozmaster
2 Min Read

पुणे: भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील लवकरच तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा आहे. पितृपक्षानंतर भूमिका जाहीर करणार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं आहे. पाटील यांच्या उमेदवारीला शरद पवार गटातील कार्यकर्त्यांचा विरोध आहे. आयात उमेदवाराला संधी नको, असा कार्यकर्त्यांचा सूर आहे. इंदापुरातील शरद पवार गटाचे कार्यकर्ते त्यांची भूमिका मांडणार आहेत. त्यासाठी ते बारामतीला येऊन शरद पवारांची भेट घेणार आहेत.महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी सीटिंग गेटिंगचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. या सुत्रानुसार इंदापूरची जागा राष्ट्रवादीला सुटेल. अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे इंदापूरचे दोन टर्म आमदार आहेत. दोन्ही वेळा ते पाटील यांचा पराभव करुन निवडून आले आहेत. महायुतीच्या सुत्रानुसार ही जागा अजित पवार गटाला मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भरणेंची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत.माजी मंत्री असलेले हर्षवर्धन पाटील गेल्या १० वर्षांपासून विधिमंडळाच्या बाहेर आहेत. त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे. त्यामुळेच यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. भरणेंना महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्यानं पाटील भाजपला रामराम करु शकतात. ते शरद पवार गटात प्रवेश करुन तुतारी हातात घेतील अशी चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून ते महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत विविध ठिकाणी, अनेक कार्यक्रमांमध्ये दिसत आहेत.इंदापूरची जागा महाविकास आघाडीत शरद पवार गटाला सुटेल. त्यामुळे विधानसभा लढायची असल्यास हर्षवर्धन पाटील यांच्याकडे तुतारी हाती घेण्याचा पर्याय आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचादेखील तसा आग्रह आहे. पण शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना आयात उमेदवार नको आहे. त्यासाठी कार्यकर्ते शरद पवारांची भेट घेणार आहेत. आपल्या भावना ते शरद पवारांकडे व्यक्त करणार आहेत. त्यामुळे इंदापूरच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा पाटील यांना विरोध असल्याचं स्पष्ट आहे.शरद पवार गटाकडून इंदापुरची जागा लढवण्यास प्रविण माने, आप्पासाहेब जगदाळे उत्सुक आहेत. आयात उमेदवार नको, त्याऐवजी पक्षातील लोकांनाच संधी द्या, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे पाटील यांची गोची होण्याची शक्यता आहे. शरद पवारांकडून उमेदवारी न मिळाल्यास पाटील यांच्याकडे अपक्ष लढण्याचा पर्याय असेल. पाटील इंदापूरमधून ४ वेळा निवडून आले आहेत. १९९५ ते २०१४ अशी सलग १९ वर्षे ते इंदापूरचे आमदार होते. या कालावधीत त्यांनी ४ निवडणुका जिंकल्या. विशे। म्हणजे यातील ३ निवडणुका ते अपक्ष लढले, तर १ निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *