मेहकर :
मेहकर-लोणार विधानसभा मतदार संघात अधिकृत उमेदवार म्हणून सिध्दार्थ खरात यांची उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष गटाच्या वतीने जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज २८ ऑक्टोबर रोजी भरणार आहे. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने मेहकर-लोणार विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्ष काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शामभाऊ उमाळकर यांनी भुषविले. त्याचबरोबर या बैठकीला शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरुभाऊ खेडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा तथा माजी आमदार सौ. रेखाताई खेडेकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अॅड. साहेबराव सरदार, अॅड. अनंत वानखेडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. आशिषभाऊ रहाटे, उपजिल्हाप्रमुख सौ. संजीवनी वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडी सौ. विजया पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आफताब खान, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस करिम खान, माजी नगराध्यक्ष विलास चणखोरे, माजी नगरसेवक भुषण मापारी, माजी नगरसेवक अशोक अडेलकर, लोणार काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेश मापारी, शिवसेना तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, शहराध्यक्ष पंकज हजारी, राष्ट्रवादी काँग्रेस लोणार तालुकाध्यक्ष संदीप मापारी, काँग्रेस शहराध्यक्ष शैलेश बावस्कर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर, कल्पना बोधेकर, केशरबाई शिंदे, शिवसेना मेहकर शहरप्रमुख किशोरभाऊ गारोळे, युवासेना तालुकाप्रमुख अॅड. आकाश घोडे, युवासेना शहरप्रमुख ऋषिकेश जगताप, अॅड. संदीप गवई, बापु देशमुख आदी नेतेमंडळी तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 21