सिंदखेड राजा
विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तसेच राज्याचे माजी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या आपुलकीच्या स्वभावामुळे सामान्य जनतेमध्ये त्यांच्याविषयी विशेष आदराचे स्थान निर्माण झाले आहे. स्वच्छ प्रतिमा, अहोरात्र काम करण्याची जिद्द आणि समाजकारणाची ओढ यामुळे ते जनसामान्यांमध्ये लोकनेते म्हणून ओळखले जातात.
राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक प्राधान्य देत कार्यकर्ते आणि जनतेशी जुळलेली नाळ त्यांनी कायम टिकवून ठेवली आहे. त्यामुळे मतदारसंघातील जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल असलेले आदरयुक्त स्थान आजही अबाधित आहे. 🙏
समाजकारण आणि जनतेच्या आशीर्वादाच्या बळावर सिंदखेड राजा मतदारसंघात गेल्या २५-३० वर्षांपासून डॉ. शिंगणे यांचे राजकारणातील महत्त्व कायम आहे. कोणत्याही नेत्याची कारकीर्द तेव्हाच उजळून निघते जेव्हा त्याच्या सामाजिक कार्याला पद आणि अधिकारांची जोड मिळते. मात्र सत्तेच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही जमिनीशी नाळ जोडून ठेवणे हेच खरे नेतृत्व असल्याचे उदाहरण डॉ. शिंगणे यांनी घालून दिले आहे.
त्यांच्या जीवनातील संघर्षही प्रेरणादायी आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते भास्करराव शिंगणे यांच्या आकस्मिक निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर उभे राहिले. मात्र या कठीण परिस्थितीतही त्यांनी धैर्याने पुढे जात समाजकारण आणि राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.
तत्त्वनिष्ठ, कर्तव्यदक्ष आणि नम्र स्वभाव असलेले डॉ. शिंगणे हे गोरगरीब आणि शेतकरी वर्गाच्या समस्या जाणून घेणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. समाजाच्या उन्नतीसाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देणारा हा लोकनेता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. 🌾
“मनासारखा राजा आणि राजासारखं मन” असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. राजेंद्र शिंगणे. त्यांच्या कार्यामुळे विकासाच्या प्रवाहात मतदारसंघातील जनतेला सहभागी होण्याचे भाग्य लाभल्याची भावना अनेक नागरिक व्यक्त करतात.
समाजकारणाला केंद्रस्थानी ठेवून प्रभावी राजकारण करणारे, दूरदृष्टी असलेले आणि सर्वसामान्य माणसांच्या वेदना समजून घेणारे नेतृत्व म्हणजेच लोकनेते डॉ. राजेंद्र शिंगणे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिष्टचिंतन व्यक्त करण्यात येत आहे.
Users Today : 22